खटाव तालुक्यात यंदाच्या वर्षी आज रोजी २.२५ टक्के पेरणी

सातारा दि : दुष्काळी परिस्थिती वर मात करून शेतकरी वर्गाने शेती उधोग  जिवंत ठेवला आहे. पण, गतवर्षाच्या मानाने यंदा पावसाने ओढ दिल्याने आज रोजी खटाव तालुक्यात फक्त २.२५ टक्के पेरणी होऊ शकली आहे.
           याबाबत माहिती अशी की,खटाव तालुक्यात २७०३६.१० हेक्टर क्षेत्र आहे. बाजरी, ज्वारी, मका, इतर तृणधान्य, तूर, उडीद, मूग, घेवडा, इतर कडधान्य, भुईमूग, सोयाबीन, बटाटा, कांदा, आले, इतर भाजीपाला असे बारा पिके घ्यावी लागतात.गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने बऱ्यापैकी खटाव तालुक्यात पेरणी झाली होती. यंदा जून महिन्यात अवघी २.२५ टक्के एवढीच पेरणी करावी लागली आहे. या आठवड्यात पुरेसा पाऊस पडला तर शेतकरी आनंदाने शेतात पेरणी करतील. बैल जोडी, फनपाळी,नांगर,चाड-मोगणा ही अवजारे कमी झाल्याने आता ट्रॅक्टर वर पेरणी करावी लागत आहे. तासाला आठशे रुपयांप्रमाणे नांगरट,फनपाळी केली जाते. त्यानंतर पेरणी केली जाते. अध्याप शिवारात ओल नसल्याने पेरणी होऊ शकली नाही. शेतकरी वर्गाने दूबारा पेरणी करण्यापेक्षा योग्य वेळी पेरणी करावी असे खटाव तालुक्यातील कृषी अधिकारी वर्गाने सांगितले.  

   शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी आर एस जितकर, कृषी पर्यवेक्षक एस एस माने, कृषी अधिकारी के के राऊत हे वेळोवेळी मार्गदर्शन करीत असल्याचे अंबवडे, कुरवली परिसरातील शेतकरी लालासाहेब माने, आनंदा साठे, सुधीर पवार,वैभव पवार, सतिश साठे, दुष्यंन पवार यांनी सांगितले. आज शेतकरी वर्गाने  स्वतः वडूज येथील खटाव कृषी कार्यालयात भेट देऊन माहिती घेतली.......... 

 

फोटो- वडूज ता खटाव येथे पेरणीसाठी रान केले आहे,,, (छाया-अजित जगताप, सातारा )

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला