लुटल्यानंतर दुचाकीसह स्वारास कालव्यात ढकलून देत पळ
लिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वारास लुटलेSatara News Team
- Sun 26th Jun 2022 05:23 am
- बातमी शेयर करा
१५० रुपयांची रोकड, १५ हजारांचा मोबाईल हिसकावला. यानंतर त्या तिघांनी जगताप यांची दुचाकी हिसकावली. दुचाकी हिसकावण्याच्या प्रयत्नास जगताप यांनी विरोध केल्यानंतर त्यांना तिघांनी मारहाण केली.
लुटमारीनंतर दुचाकीसह एकाला टाकले कालव्यात
सातारा : सातारा एमआयडीसीत असणाऱ्या महाराष्ट्र स्कूटर्स परिसरात लिफ्टच्या बहाण्याने दुचाकीस्वारास अडवत तिघांनी मारहाण करून त्याच्याकडील रोकड, मोबाईल हिसकावल्याची घटना काल सायंकाळी घडली. लूटमार करणाऱ्यांनी ऐवज लुटल्यानंतर दुचाकीसह स्वारास कालव्यात ढकलून देत पळ काढला. याप्रकरणी तीन अज्ञातांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गोडोली येथील गोळीबार मैदान परिसरात अमोल बाळकृष्ण जगताप (वय ४०) हे राहण्यास आहेत. काल ते दुचाकीवरून महाराष्ट्र स्कूटर्स परिसरात गेले होते. स्कूटर कंपनीच्या गेटजवळ आले असतानाच त्यांना एकाने लिफ्ट मागितली. यामुळे दुचाकी थांबवत असतानाच लिफ्ट मागणाऱ्या व त्याच्या दोन साथीदारांनी जगताप यांना घेरले. मारहाण करत त्या तिघांनी जगताप यांच्याकडील १५० रुपयांची रोकड, १५ हजारांचा मोबाईल हिसकावला. यानंतर त्या तिघांनी जगताप यांची दुचाकी हिसकावली. दुचाकी हिसकावण्याच्या प्रयत्नास जगताप यांनी विरोध केल्यानंतर त्यांना तिघांनी मारहाण केली.
मारहाण करणाऱ्या त्या तिघांनी नंतर जगताप यांना, तसेच त्यांच्या दुचाकीस कालव्यात फेकले व पळ काढला. याची तक्रार जगताप यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली असून, तपास उपनिरीक्षक मोरे हे करीत आहेत. गेले काही दिवस सातारा एमआयडीसीत गुन्हेगारी कारवाया वाढल्या असून, त्यामध्ये त्याच परिसरातील स्थानिक युवकांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी या स्थानिक टोळीच्या मुसक्या आवळण्याची मागणी उद्योजक, व्यावसायिकांनी केली आहे.
Crimecase
golibarmedan
satarasp
स्थानिक बातम्या
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 26th Jun 2022 05:23 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 26th Jun 2022 05:23 am
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Sun 26th Jun 2022 05:23 am
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sun 26th Jun 2022 05:23 am
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 26th Jun 2022 05:23 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sun 26th Jun 2022 05:23 am
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Sun 26th Jun 2022 05:23 am
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Sun 26th Jun 2022 05:23 am
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sun 26th Jun 2022 05:23 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sun 26th Jun 2022 05:23 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sun 26th Jun 2022 05:23 am
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sun 26th Jun 2022 05:23 am












