मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्यामुळे उरमोडी धरणातील उपसा सिंचनासाठी पाणी आरक्षित..

उरमोडीचे पाणी आरक्षित केल्याने 375 क्षेत्र ओलिताखाली येणार

देशमुखनगर : भाजपाचे कऱ्हाड उत्तर निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्यातून उरमोडी धरणातील काशीळ येथील उपसा सिंचन योजनासाठी पाणी आरक्षित झाल्याने काशीळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आरक्षित पाण्यामुळे गावातील 375 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

अनेक वर्षापासून मागणी आरक्षित पाण्याची मागणी होती. श्री. घोरपडे यांच्या प्रयत्नातून ही मागणी पुर्ण झाली आहे. यामुळे शेकडो शेतकऱ्यांची शेती बागायत होण्यास मदत होणार आहे. त्याच्या प्रयत्नाबद्दल नुकतेच ग्रामपंचायत, काशीळ ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. घोरपडे म्हणाले, महायुतीच्या सरकार लोकांच्या सेवेसाठी सतत प्रयत्नशील आहे. काशीळ गावच्या सर्वागीण विकासासाठी आम्ही कायम प्रयत्नशील रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी उपसरपंच रोहन माने म्हणाले, मनोज घोरपडे यांच्या पाठपुराव्यातून गावातील 375 क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी माजी उपसरंपच अजय जाधव, जेष्ठ नेते सुरेश माने, विश्वास जाधव, बाळासाहेब माने, बाळासाहेब भोसले, शिवाजी कोरे, अमोल माने, सुरेश भोसले, हणमंत कोळेकर, भिकु मारे, पंतग जाधव, चंद्रकांत माने, दादा काशीद, सुभाष मोरे, हेमंत जाधव, प्रकाश पाटील, सोमनाथ तळेकर, सयाजी माने, संदीप साळुंखे, रोहन जाधव, सुनील घाडगे, प्रवीण केंजळे, मधुकर गाढवे, अमोल पवार, समाधान जाधव, संजय माने, महेश माने, विकास घाडगे, चंद्रकांत जाधव, संभाजी पवार, धनाजी जाधव, संतोष जाधव, सत्यम जाधव, अमोल सोनावणे आदी उपस्थित होते.  

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त