तब्बल 17 घोणसीचे पिल्ले सापडल्यानंतर कराडच्या प्रीतीसंगम बागेत आता सापडला नाग
Satara News Team
- Tue 17th Jun 2025 06:15 pm
- बातमी शेयर करा

कराड : कराडच्या प्रीतिसंगम बागेत मागील तीन आठवड्यात घोणस जातीच्या तब्बल 17 पिल्लांना पकडण्यात आले होते. या पिल्लांसह 2 मोठ्या धामण, 1 तस्कर आणि 2 कुकरी, 1 नाग अशा एकूण 24 सर्प पकडण्यात आली होती. सर्प आढळत असल्याने सात दिवस बंद ठेवण्यात आलेली प्रीतिसंगमावरील स्वामीबाग नुकतीच खुली करण्यात आली होती. मात्र, आज बागेमध्ये नाग जातीचा सर्प नागरिकांना दिसून आला. त्यानंतर सर्पमित्र बबलू लोहाना यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागाला ताब्यात घेत सुरक्षितस्थळी सोडून दिले.
कोयना आणि कृष्णा नदीचा संगम पावलेल्या कराडच्या प्रीतिसंगम घाटावर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळ परिसरात स्वामीची बाग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून व परिसरातून पर्यटक येत असतात. मागील काही दिवसांपासून या बागेत अनेक प्रकारचे सर्प आढळून आले. मध्यंतरी घोणस जातीच्या सर्प व पिल्लांमुळे पर्यटन व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाग काही दिवस बंद ठेवण्यात आली होती. या ठिकाणी घोणस जातीच्या १७ पिल्लांना पकडण्यात आले होते. घोणस जातीच्या पिल्लांना सुरक्षितस्थळी सोडण्यात आल्यानंतर बाग नागरिकांसाठी पुन्हा खुली करण्यात आली होती. मात्र, आज बागेत नाग आढळून आला. एका नागरिकाला नाग दिसल्याने त्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्याला याची तत्काळ माहिती दिली. त्यानंतर बागेतील स्वच्छता कर्मचारी व नागरिकांनी सर्पमित्र बबलू लोहाना यांना माहिती दिली.
माहिती मिळाल्यानंतर बबलू लोहाना यांनी क्षणाचाही विलंब न लावता बागेकडे धाव घेतली व सदर नाग पकडला. नाग पकडल्यानंतर बबलू लोहाणा यांनी त्यास सुरक्षित ठिकाणी सोडून दिले.
कराड येथील प्रीतिसंगम घाटावरील बागेत आठवडाभरात अनेक सर्प आढळून आले आहेत. त्यांना सुरक्षितस्थळी सोडून देण्यात आले आहे. सर्प आढळल्याने बंद ठेवलेली बाग कालपासून सुरू करण्यात आली होती. मात्र, आज या ठिकाणी नाग आढळून आला. त्याची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न लावता धाव घेत नागाला ताब्यात घेऊन सुरक्षितस्थळी अधिवासात सोडून देण्यात आले असल्याची माहिती सर्प मित्र बबलू लोहाणा यांनी दिली.
स्थानिक बातम्या
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Tue 17th Jun 2025 06:15 pm
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार, दि. २८ जून २०२५
- Tue 17th Jun 2025 06:15 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज २७/६/२०२५ शुक्रवार
- Tue 17th Jun 2025 06:15 pm
'कॉन्स्टेबल मंजू' मालिकेच्या सेटवर घडली मन हेलावून टाकणारी घटना
- Tue 17th Jun 2025 06:15 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज २६/६/२०२५ गुरुवार
- Tue 17th Jun 2025 06:15 pm
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Tue 17th Jun 2025 06:15 pm
संबंधित बातम्या
-
हजारो भाविक व वारकऱ्यांच्या उपस्थिती सेवागिरी महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान
- Tue 17th Jun 2025 06:15 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेचे आधारवड संस्था सचिव तुषार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
- Tue 17th Jun 2025 06:15 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार, दि. २८ जून २०२५
- Tue 17th Jun 2025 06:15 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज २७/६/२०२५ शुक्रवार
- Tue 17th Jun 2025 06:15 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज २६/६/२०२५ गुरुवार
- Tue 17th Jun 2025 06:15 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज २५/६/२०२५ बुधवार
- Tue 17th Jun 2025 06:15 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज २३/६/२०२५ सोमवार
- Tue 17th Jun 2025 06:15 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज २२/६/२०२५ रविवार
- Tue 17th Jun 2025 06:15 pm