शामगांव घाट ते गोपूज रस्त्याची दयनीय अवस्था; रस्त्याची डागडुजी तर दूरच, साधे खड्डे बुजविण्याचीही प्रशासनाला उसंत नाही का?

कराड उत्तर मध्ये दोन आमदार, अनेक आश्वासने; मग रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाची?

पुसेसावळी : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाला विधानसभा सदस्य आमदार मनोज घोरपडे आणि विधानपरिषद सदस्य आमदार धैर्यशील कदम असे दोन लोकप्रतिनिधी लाभले आहेत. मात्र, या मतदारसंघातील शामगांव घाट ते गोपूज या महत्त्वाच्या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता, दोन आमदार असतानाही नागरिकांच्या वाट्याला खड्ड्यांनी भरलेला प्रवास का येत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

            शामगांव घाट ते गोपूज या मार्गावर ठिकठिकाणी रस्त्याचा पृष्ठभाग उखडला असून, मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की, वाहनचालकांना खड्डे चुकवत मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांना या रस्त्यावरून प्रवास करताना विशेष त्रास सहन करावा लागत असल्याची परिस्थिती आहे.

          विशेष म्हणजे, रस्त्याचे कायमस्वरूपी नूतनीकरण होईपर्यंत किमान तात्पुरत्या स्वरूपात टिकतील अशा प्रकारचे साहित्य वापरून खड्डे बुजविण्याचे काम तरी होणे अपेक्षित आहे. मात्र, रस्त्याची सद्यस्थिती पाहता अशा प्राथमिक उपाययोजनांचाही अभाव दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग नेमके कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे? नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी नेमकी कोणाची? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

  एका बाजूला मतदारसंघात दोन आमदारांचे प्रतिनिधित्व असताना दुसऱ्या बाजूला नागरिकांना मात्र खड्ड्यांच्या साम्राज्यातून प्रवास करावा लागत असेल, तर लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या समस्येचा पाठपुरावा नेमका कुठपर्यंत झाला आहे, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.

   आमदार मनोज घोरपडे आणि आमदार धैर्यशील कदम यांनी या रस्त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले आहे काय? संबंधित विभागाकडून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अहवाल मागविण्यात आला आहे काय? निधीची तरतूद, कामाचे नियोजन आणि प्रत्यक्ष दुरुस्ती याबाबत कोणती कार्यवाही झाली आहे? की नागरिकांच्या या ज्वलंत प्रश्नाकडे अद्यापही अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नाही?

    लोकप्रतिनिधींची संख्या दोन असणे ही नागरिकांसाठी निश्चितच प्रतिनिधित्वाची बाब आहे; मात्र त्या प्रतिनिधित्वाचा लाभ मूलभूत सुविधांच्या स्वरूपात नागरिकांना मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. केवळ विकासाच्या घोषणा आणि आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष रस्त्यावर दिसणारे काम नागरिकांसाठी अधिक महत्त्वाचे आहे.

          त्यामुळे आमदार मनोज घोरपडे आणि आमदार धैर्यशील कदम यांनी या प्रश्नात लक्ष घालून संबंधित विभागाला तातडीने खड्डे बुजविण्याचे निर्देश द्यावेत, तसेच रस्त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. अन्यथा, दोन आमदार लाभलेल्या कराड उत्तरमधील नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांचेच लोण सहन करावे लागणार का? हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

शामगांव घाट ते गोपूज रस्त्याची दयनीय अवस्था; रस्त्याची डागडुजी तर दूरच, साधे खड्डे बुजविण्याचीही प्रशासनाला उसंत नाही का?

शामगांव घाट ते गोपूज रस्त्याची दयनीय अवस्था; रस्त्याची डागडुजी तर दूरच, साधे खड्डे बुजविण्याचीही प्रशासनाला उसंत नाही का?

शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका

शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका

शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?

शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?

मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

 पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म

पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म

कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात

कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला