शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका
चार भिंतीकडे जाणाऱ्या मार्गावर जीवघेणी परिस्थिती; तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिक महिलांची नगरपरिषदेकडे मागणीSatara News Team
- Mon 23rd Nov 2026 02:48 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरातील केसरकर पेठ परिसरातील शाहूनगर चौकातून चार भिंतीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. रस्त्याची डाव्या बाजूची कड पूर्णपणे खचली असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच रस्त्यालगत असलेल्या गटाराचे झाकण तुटून उघडे पडल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी या ठिकाणी असलेले खड्डे आणि उघडे गटार वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नसल्याने दुचाकीस्वार तसेच पादचारी अपघाताच्या भीतीखाली वावरत आहेत. या ठिकाणी छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे स्थानिक नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सौ. सोनाली वंजारी, सौ. कांबळे आणि सौ. इंगळे यांनी परिसरातील नागरिकांच्या वतीने २३ नोव्हेंबर रोजी सातारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांकडे लेखी तक्रार व निवेदन सादर केले.
रस्त्याची खचलेली कड तातडीने डांबरीकरण व मजबुतीकरण करून दुरुस्त करावी, तुटलेल्या गटारावर मजबूत आरसीसी किंवा लोखंडी जाळीचे झाकण बसवावे, तसेच दुरुस्ती होईपर्यंत संबंधित ठिकाणी बॅरिकेड्स आणि धोक्याचे सूचना फलक लावावेत, अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
निवेदनासोबत घटनास्थळाची छायाचित्रे आणि स्थानिक नागरिकांच्या सह्यांची यादीही जोडण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा प्रश्न असल्याने सातारा नगरपरिषदेने प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
आता नगरपरिषद प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन संभाव्य अपघात रोखण्यासाठी किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक बातम्या
शाहूनगर चौकातील रस्ता खचला; उघड्या गटारामुळे अपघातांचा धोका
- Mon 23rd Nov 2026 02:48 pm
शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?
- Mon 23rd Nov 2026 02:48 pm
मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
- Mon 23rd Nov 2026 02:48 pm
पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म
- Mon 23rd Nov 2026 02:48 pm
कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
- Mon 23rd Nov 2026 02:48 pm
दुर्योधनाच्या अहंकारामुळे महाभारत... जयकुमार गोरेंचा तोच अहंकार भाजपला नडणार ?
- Mon 23rd Nov 2026 02:48 pm
संबंधित बातम्या
-
मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
- Mon 23rd Nov 2026 02:48 pm
-
पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म
- Mon 23rd Nov 2026 02:48 pm
-
मसूर पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली?
- Mon 23rd Nov 2026 02:48 pm
-
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Mon 23rd Nov 2026 02:48 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Mon 23rd Nov 2026 02:48 pm
-
फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित
- Mon 23rd Nov 2026 02:48 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Mon 23rd Nov 2026 02:48 pm
-
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 23rd Nov 2026 02:48 pm










