अल्पवयीन मेव्हणीवर दुष्कर्म करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाजी व त्याच्या वडिलास जन्मठेप व ३ लाख रूपये दंड
सतिश जाधव - Thu 9th May 2024 12:33 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : १४ वर्षीय अल्पवयीन मेव्हणीवर दुष्कर्म करून तिच्या डोक्यात दगड घालून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाजीस(भाऊजीस) व त्याच्या वडीलास दोषी धरून येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दीड लाख रूपये दंड ठोठावला. दंडाच्या तीन लाख रूपये रक्कमेपैकी एक लाख रूपये पीडीतेस (निर्भया) देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. दि. ७ जानेवारी २०१९ रोजी करमाळा तालुक्यात सदरची घटना घडली होती. याबाबत निर्भयाच्या बहीणीने फिर्याद दिली होती.
फिर्यादी ही तिचे पती हे एका शेतकऱ्याकडे कामास होते. शेतातच ती पती, लहान मुलगा व १४ वर्षाची बहीणीसोबत राहत होती. घटनेदिवशी फिर्यादी शेतमालकाच्या भावाच्या शेतात कांदा काढण्याचे कामास गेली होती. त्यावेळी तिचे पती, लहान मुलगा व िनर्भया असे तिघे घरी होते. घराचे शेजारीच ऊसाला पाणी देण्याचे काम सुरू होते. त्यामुळे फिर्यादीचा पती घराच्या आजूबाजूस होते. दुपारी १२ च्या सुमारास फिर्यादीकडे तिचा पती गेला व निर्भया ही सकाळी १०.३० च्या सुमारास शौचास जाते म्हणून गेली आहे ती बराच वेळ झाला तरी परत आलेली नाही असे सांगितले. त्यानंतर शेतमालकाच्या शेतात शोध घेत असताना फिर्यादीच्या पतीने िनर्भया ही ऊसात असल्याचे ओरडून सांगितले. त्यावेळी फिर्यादी पळत तेथे गेली असता तिला िनर्भया ऊसाचे सरीत रक्ताच्या थारोळयात पडलेली दिसली. डोकीत मार लागून रक्त येत होते व जवळच दोन दगड रक्ताने माखलेले होते तसेच अतिप्रसंगामुळे रक्त येत होते. ती बेशुध्द अवस्थेत होती. फिर्यादी व इतरांनी तिला सुरूवातीला करमाळा व तेथून लगेच सोलापूर येथे उपचारार्थ दाखल केले. अज्ञात व्यक्तीने निर्भयावर दुष्कर्म करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार निर्भयाच्या बहीणीने पोलीसांत दिल्यानंतर अज्ञात आरोपीविरोधात करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला होता.
करमाळा पोलीस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. फिर्यादीच्या पतीची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्यांनी घराची झडती घेतली असता त्यांचा संशय खरा ठरला व महत्वपूर्ण पुरावे हाती लागले. त्यांनी फिर्यादीच्या पतीस अटक केली. दरम्यान, िनर्भयाच्या डोक्यात दगडाचा जबर मार लागल्याने तिची मृत्यूशी झुंज सुरू हाेती. सुमारे दोन महिन्यापेक्षा अधिक काळाच्या उपचारानंतर निर्भया शुध्दीवर आली. त्यावेळी तिने तिच्या दाजीने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचे व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे तसेच दाजीच्या वडीलानेही अत्याचार केल्याची पोलीसांकडे तक्रार केली. नंतर पोलीसांनी त्यालाही सहआरोपी करत गजाआड केले. एपीआय रविंद्र तेलतुंबडे यांनी सबळ पुरावे गोळा करून आरोपीविरोधात दोषारोपपत्र न्यायालयात ठेवले.
अति. सत्र न्यायाधीश जे.सी.जगदाळे यांच्यासमोर या खटलयाची सुनावणी झाली. यात सरकारतर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, निर्भया, डॉक्टर व तपासाधिकारी यांची साक्ष यात महत्वाची ठरली. सरकारपक्षाने सबळ पुरावे न्यायालयासमोर ठेवले. आरोप शाबीत झाल्याने न्यायालयाने आरोपी पिता-पुत्रास दुष्कर्म प्रकरणी जन्मठेप व प्रत्येकी ५० हजार रूपये दंड, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ५० हजार दंड तसेच पोक्सो कलम ४ अन्वये २० वर्ष कारावास व प्रत्येकी ५० हजार रूपये दंड, पोक्सो ६ अन्वये ३ वर्षे शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे अॅड प्रदीप बोचरे, अॅड दिनेश देशमुख, अॅड राजश्री कदम यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून नितीन ताकभाते, जोतिराम बाळसराफ व अतुल पाटील यांनी काम पाहिले.
तपासाधिकारी रविंद्र तेलतुंबडे यांचा कौशल्यपुर्ण तपास, सबळ पुरावे गोळा केले
अज्ञात आरोपीविरोधात हा गुन्हा दाखल होता. या गुन्हयाचे तपास अधिकारी आणि सध्याचे सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र तेलतुंबडे यांनी तपास कौशल्यपूर्ण तपास करून अारोपी शोधून काढला. आरोपींविरूध्द सबळ पुरावे गोळा करून दोषारोपपत्र दाखल केले. सबळ पुरावे, साक्षीच्या आधारे न्यायालयाने आरोपींना शिक्षा ठोठावली.
स्थानिक बातम्या
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 9th May 2024 12:33 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 9th May 2024 12:33 pm
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Thu 9th May 2024 12:33 pm
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Thu 9th May 2024 12:33 pm
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 9th May 2024 12:33 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Thu 9th May 2024 12:33 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Thu 9th May 2024 12:33 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Thu 9th May 2024 12:33 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Thu 9th May 2024 12:33 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Thu 9th May 2024 12:33 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Thu 9th May 2024 12:33 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Thu 9th May 2024 12:33 pm












