वाईन शॉप च लायसन देतो असे सांगून साडेतीन कोटीची फसवणूक करणाऱ्या अटक

जाहीर आवाहन :- सदर भामटयांनी अशाच प्रकारे किंवा अन्य कारणांसाठी कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क करावा. असे आवाहन करण्यात येत आहे.

सातारा : वाईन शॉप चा लायसन देतो असे सांगून आत्तापर्यंत तीन ते साडेतीन कोटी रुपयाला फसवणूक करणाऱ्या एका जोडी सातारा शहर पोलिसांनी केली अटक याबाबत शहर पोलिसांच्या कडून मिळालेली माहिती अशी की विनायक रामगुडे आणि कलावती उर्फ प्रिया चव्हाण या दोघांनी पुणे मुंबई कोरेगाव या ठिकाणी वाईन शॉप चे लायसन देतो असे सांगून कोट्यावधी रुपये घेऊन फसवणूक करून फरार झाले होते शहर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींना शोधण्यासाठी पथक तयार केले आरोपींनी स्वतःचे अस्तित्व लपवण्यासाठी स्वतःचे नाव ओळखपत्र बदलून तसेच चेहऱ्यावर दाढीचा कट बदलून केसाचा विग वापरून दुसरे सिम घेऊन समाजात वावरत होते बऱ्याच वर्षापासून हे आरोपी मिळून येत नव्हते. 

 सातारा शहर डीबी पथकाने अत्यंत चिकाटीने विविध जिल्ह्यातून तसेच हैदराबाद , तेलंगणा , कर्नाटक , आंध्र प्रदेश या राज्यात संपर्क करून चौकशी करून या भामट्यांची माहिती प्राप्त केली तेव्हा सदरचा भामटा  हा बेंगलोर हैदराबाद आंध्र प्रदेश शहरांमध्ये वावरत असल्याचे समजले समजलेल्या माहितीच्या आधाराखाली सातारा डीबी पथक हे बेंगलोर या ठिकाणी गेली चार दिवस बेंगलोर शहरांमध्ये विविध ठिकाणी चौकशी केली तसेच सीसीटीव्ही तपासून माहिती प्राप्त केली असता सदरचा भामटा  हा विविध ठिकाणी तसेच वाहनांमध्येच मुक्काम करत असल्याने त्याचा ठाव ठिकाणा समजून येत नव्हता . 
हे करत असताना सदरचा संशयित आरोपी हा बेंगलोर शहरातून एका हवे लगतच्या सर्विस रोड वरून इनोव्हा गाडीने परराज्यात जाणार असल्याची माहिती पोलिसाना मिळाली आरोपी हा पळून जाण्यात माहीरअसल्याने पोलिसांनी त्या ठिकाणी मुद्दामहून ट्राफिक जाम केले व आरोपीच्या मागे व पुढे पोलिसांची खाजगी वाहने लावून आरोपीस मोठ्या शीतपणे ताब्यात घेतले या गुन्ह्यामध्ये कलावती उर्फ प्रिया चव्हाण या संशयित महिलेचा सुद्धा समावेश असल्याकारणाने तिला सुद्धा पुणे येथून ताब्यात घेण्यात आले सदर गुन्ह्यत आणखीन काही आरोपी आहेत का याचा तपास सध्या पोलीस करत आहेत

सदर आरोपींकडे दहा मोबाईल अनेक सिम कार्ड बनावट ओळखपत्रे केसांचा विंग मिळून आलेला असून त्यांच्याकडील मोबाईलची  तपासणी केल्यानंतर त्याने महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच परराज्यामध्ये बऱ्याच लोकांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.  या दोन संशयित आरोपींना अटक केली असून त्यांना चार दिवसाची पोलिस रिमांड घेण्यात आली आहे.  पुण्यामध्ये या आरोपींना मदत करणारे एक महिला व युवक यास देखील ताब्यात घेण्यात आल्या असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे


सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक साो, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री. राजीव नवले, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मस्के, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. श्री. अविनाश माने ( सध्या नेमणूक प्रभारी वाठार पोलीस ठाणे ) पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, श्री. अविनाश गवळी पो.हवा. निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, पो.ना. पंकज मोहिते, विक्रम माने, पो.कॉ., इरफान मुलाणी, मच्छिंद्रनाथ माने, संतोष घाडगे, सागर गायकवाड, सचिन रिटे, विशाल धुमाळ, सुशांत कदम, तुषार भोसले, महिला कॉन्स्टेबल प्रियांका धनावडे, कोडोली गावचे पोलीस पाटील राजेंद्र भोईटे, सायबर पोलीस ठाणेचे पो. कॉ. महेश पवार, ओमकार डुबल, प्रशांत मोरे, यशवंत घाडगे यांनी केलेली आहे.

आरोपीचे नाव :-
१) विनायक शंकर रामुगडे वय ४४ वर्षे रा. ओगलेवाडी ता. कराड जि. सातारा
२) महिला आरोपी नामे कलावती उर्फे प्रिया रामचंद्र चव्हाण वय ४३ वर्षे मूळ रा. कोरेगाव ता. कोरेगाव जि. सातारा सध्या रा. शाहूनगर, गोडोली सातारा
३) अनुजा मंगेश जाधव वय २६ वर्षे रा. चंदननगर कोडोली सातारा
४) कुणाल अमर भांडे वय २४ वर्षे रा. शाहुनगर गोडोली सातारा

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त