जावळीतून गणेशोत्सव कालावधीमध्ये सहा जण हद्दपार.

जावली .:  मेढा.मा. पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख,मा.अप्पर पोलीस अधीक्षकं श्रीमती.वैशाली कडूकर,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.बाळासाहेब भालचिम,यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.पृथ्वीराज ताटे मेढा पोलीस ठाणे यांना मेढा पोलीस ठाणे हद्दीमधील सराईत गुन्हेगार यांचेवर कारवाई करणेबाबत सूचना दिल्या होत्या.

 

सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पडणेकरीता तसेच शांतता व सुव्यवस्था बिघडू नये याकरीता मा.सुधाकर भोसले प्रांत अधिकारी,सातारा यांना मेढा पोलीस ठाणे कडील रेकॉर्डवरील आरोपी क्र.१) नितीन राजेंद्र लोखंडे रा. कुडाळ ता.जावली,२) तन्वीर हमिद पठाण रा.जवळवाडी ता.जावली,३) मंगेश भरत निकम रा.करंदी ता.जावली, ४) गणेश विष्णु धनावडे रा. करंजे ता.जावली,५) आकाश विठ्ठल आगलावे रा.बिभवी ता.जावली ६) अतुल रमेश खटावकर रा.कुडाळ ता.जावली यांचेविरूद्ध प्रतिबंधक कारवाई करणेकामी बी.एन.एस.एस.कलम १६३ अन्वये प्रस्ताव सादर करणेत आलेला होता.त्या अनुशंगाने मा.हणमंत कोळेकर तहसिलदार जावली यांनी दि. ७/९/२०२४ ते १८/९/२०२४ पर्यंत सदर सराईत आरोपीना हद्दपार केलेबाबत आदेश पारीत केलेला आहे.त्याअनुशंगाने गणेशोत्सव कालावधीमध्ये सदर आरोपीना मेढा पोलीस ठाणे हद्दीतून दि १८/९/२०२४ अखेर हद्दपार करणेत आलेले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त