सिद्धेश्वर कुरोली येथील दोघांना निर्भया पथकाचा दणका, आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी.

पुसेसावळी : अल्पवयीन मुलींची छेडछाडीचे प्रकारात होत असेलेली वाढ आणि कायद्याचे कमी होत असलेले भय याचे पर्यवसन होऊन भयानक आणि गंभीर प्रकाराकडे सुरू असलेल्या वाटचालीतील गुन्हेगारी प्रवृत्ती च्या इसमांना मा.अश्विनी शेंडगे, उपविभागीय पोलिस अधिकारी, दहिवडी कॅम्प वडूज यांच्या मार्गदर्शनाखालील माण - खटाव मधील कार्यरत असलेल्या निर्भया पथक नंबर ५ च्या पथकाने "खाक्या" दाखवत कारवाई चा दणका दिल्याने पालकवर्गात "निर्भय" तेची भावना निर्माण झाली आहे.

सिद्धेश्वर कुरोली येथील दोन अल्पवयीन मुलींची छेडछाड करणाऱ्या दोन इसमांना दिनांक १४ सप्टेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अल्पावधीतच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वडुज यांच्या नेतृत्वाखालील निर्भया पथक नंबर ५ कडून सदरच्या अल्पवयीन मुलींचे समुपदेशन करुन संबंधित छेडछाड करणारे दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. संबंधित पिडीतांनी दिलेल्या माहितीनुसार वडुज पोलीस ठाणे येथे गु.र नं ३००/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ७८, ७९ पोस्को १२ आणि गु.र नं ३०१/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ७८,७९ पोस्को १२ प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आला असून १) सुमित पृथ्वीराज देशमुख, २) साईराज किरण बागल, दोन्ही रा. सि. कुरोली यांना अटक करणेत आली आहे. मा.न्यायालय वडूज यांचेसमोर आज हजर केले असता मा.न्यायालयाकडून संबंधित आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

 सदरची कारवाई मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, श्रीमती अश्विनी वाघमारे, पोलीस नाईक सचिन जगताप, पो.कॉं. संजय जाधव, सागर पोळ, श्रीमती. राजश्री खाडे, श्रीमती.सुमाली घाडगे वडुज पोलीस ठाणेचे पोलीस हवा. मल्हारी हांगे, पो.कॉं. तुषार हांगे यांनी सदरची कारवाई केली असुन सदर दोन्ही गुन्हयाचे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक, वाघ आणि कांबळे हे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत  बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त