प्रेम संबंधातून तृतीयपंथी राशी उर्फ राहुल घुटुकडे याचा खून....

अवघ्या सहा तासात म्हसवड पोलिसांनी तपास करत आरोपीस घेतले ताब्यात.

आंधळी : माण तालुक्यातील म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मासाळवाडी ता. माण येथील नागोबा मंदिर ते पानवण जाणाऱ्या कच्चा रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये तृतीयपंथी राहुल घुटुकडे याचा अज्ञाताकडुन खून    म्हसवड पोलिसांनी अवघ्या सहा तासात तपास करत आरोपीस घेतले ताब्यात. 

याबाबत पोलिसांकडून सविस्तर मिळालेली माहिती अशी की, म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मासाळवाडी नागोबा मंदिर ते पानवन जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत विजय सिन्हा यांच्या विहिरीत एक अनोळखी महिलेची प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याची माहिती डायल ११२ वरून फोनवरून समजली सदरच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन  विहिरीच्या पाण्यावर कुजलेल्या स्थितीत तरंगत असलेले प्रेत पंचनामा करण्यासाठी बाहेर काढले त्यावेळी मिळालेल्या माहितीवरून सदरचा मृत्यू व्यक्तीचा गळा होऊन खून करून त्याचे पुरावे नष्ट करण्याचे उद्देशाने कमरेस लाईटच्या केबल सुमारे ३० किलो वजनाचा दगड बांधून विहिरीत टाकल्याचे दिसत होते. यावरून पोलिसांना प्रेताच्या नातेवाईक व आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्याच्या तिन्ही अहवाला समोर जावे लागले. 


    यावेळी मयताच्या उजव्या हातावर इंग्रजीत समाधान व डाव्या हातावर मराठीत आईबाचा असे गुदलेले असल्याचे दिसून आल्याने मयताच्या नातेवाईकाचा शोध घेण्यास सदरची माहिती सोशल मीडिया व प्रसारित करून संपर्क साधला असता अनोळखी व्यक्ती मोटेवाडी ता. माण जि. सातारा येथील तृतीयपंथी राशी उर्फ राहुल आजिनाथ घुटूकडे वय :२५ वर्ष हा असल्याचे निष्पन्न झाले. सदर मयत व्यक्तीचा कोणीतरी खून केले असल्याची माहिती गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवून आरोपीचा शोध सुरू केला असता मयत तृतीयपंथी राहुल घुटूकडे संशयित आरोपी समाधान विलास चव्हाण रा. दिवड ता माण जि. सातारा याच्यासोबत प्रेम संबंध असल्याचे निष्पन्न झाले. यावरून आरोपीस सापळा रचून त्याला शेतातून ताब्यात घेतले असता त्याने वरील गुन्हा आपणच केला असल्याचे कबुली दिली.त्यावेळी त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आले. 


      सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे दहिवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि. सखाराम बिराजदार पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे पोलीस अंमलदार शशिकांत खाडे, अमर नारनवर, पोपट चव्हाण, रूपाली फडतरे ,जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, धीरज कवडे, वसीम मुलाणी, श्रीकांत सुद्रिक यांनी केली असून कारवाई मध्ये सहभागीय अधिकारी व  अमलदार यांचे पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत  बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त