सासरच्या छळास कंटाळून प्राध्यापिकेने राहत्या घरात घेतला गळफास

कराड : माहेरहून दहा लाख रुपये आणण्यासाठी सतत होणार्‍या छळास कंटाळून पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील प्रा. सौ. प्रियांका रणजित पाटील (वय 31) हिने राहत्या घरात फॅनला साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी कराड तालुक्यातील आहेत.

पती रणजित सुभाष पाटील, सासू सौ. शोभा सुभाष पाटील, सासरे सुभाष हिंदुराव पाटील, दीर इंद्रजित सुभाष पाटील, जाऊ सौ. प्रज्ञा इंद्रजित पाटील आणि नणंद सौ. शीतल चव्हाण (रा. कोळे, ता. कराड, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा पती, सासू, दीर व जाऊ यांना अटक करण्यात आली आहे.

प्रियांकाचे वडील सुनील वसंतराव पवार (रा, कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली. कुंडल येथील प्रियांकाचा विवाह रणजित पाटील याच्याशी 2017 मध्ये झाला होता. प्रियांकाला माहेरहून खासगी साखर कारखाना खरेदीसाठी दहा लाख रुपये आणण्याची मागणी सुरू केल्यावर तिने पाच लाख रुपये आणले होते. परंतु, अजून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिला शिवीगाळ, मारहाण करत छळ सुरू होता. याला कंटाळून तिने जीवनयात्रा संपविली. केली. अधिक तपास शाहूवाडीचे पोलिस उपाधिक्षक आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कैलास कोडग करत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत  बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त