ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा पांचगणी पोलिसांकडून निकाली

पाचगणी : पाचगणी पाेलिसांच्या तत्परतेमुळे ऑनलाईन फसवणूक झालेल्या पाचगणी येथील एका नागरिकाची रक्कम परत मिळवून देत पाचगणी पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.नागरिकांची ऑनलाईन व्यवहारांना पसंती वाढल्याने ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे देखील वाढले आहेत. अशा गुन्ह्यांमध्ये आराेपींना पकडने अवघड असल्याने नागरिकांची निराशाच होती. 

याबाबत पाचगणी पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील वैभव कदम यांनी १० हजार रुपये गेले या बाबत ऑनलाईन फ्रॉड झाल्याची ऑनलाईन तक्रार २७ जुलै रोजी दाखल केली होती पाचगणी सायबर ब्रांच यांच्या मदतीने फ्रॉड रक्कम १० हजार रुपये त्यांना परत मिळवून देण्यात यश आलेले आहेत. पाचगणी सायबर पोलिसांनी तत्परता दाखवत तक्रारदाराची रक्कम परत मिळवून दिल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या टीमचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले अनेकदा नागरिकांनी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला ओटीपी शेअर केला असेल तर अशा प्रकरणांमध्ये बॅंकेकडून ते पैसे परत केले जात नाहीत. हे पैसे विविध मर्चंट, विविध ऑनलाईन वाॅलेट मध्ये गेलेले असतात. अशावेळी सायबर सेल संबंधित मर्चंट, वाॅलेट यांना मेलद्वारे पत्रव्यवहार करुन अर्जदारांना त्यांची रक्कम परत करते. दुसऱ्या प्रकारात जर नागरिकांननी ओटीपी शेअर केला नसेल किंवा तक्रारदाराचे डेबीट किंवा क्रेडीट कार्ड त्याच्या ताब्यात असताना सुद्धा खात्यावरील रक्कम काढली गेली असेल तर अशावेळी सायबर सेलकडून संबंधित बॅंकेला पत्रव्यवहार केला जाताे. ठराविक काळानंतर बॅंकेकडून किंवा मर्चंट, ई- वाॅलेट कडून रक्कम नागरिकांना परत केली जाते.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

शिवथर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत  बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये आवाजाच्या स्पर्धेत बाप्पांना निरोप !,.... मिरवणुकीत बीम लाइट लावल्याने गुन्हा दाखल

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त