जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षकांच्या हस्ते दहिवडी पोलीस ठाण्याचा गौरव.

जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षकांच्या हस्ते दहिवडी पोलीस ठाण्याचा गौरव.

आंधळी : दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब व टीमला सर्वोत्कृष्ट महिला पथदर्शी प्रकल्प मध्ये माहे एप्रिल 2024 मध्ये जिल्ह्यातील सर्वोत्तम कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक, सातारा समीर शेख, पोलीस उपाधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय अधिकारी दहिवडी विभाग अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या हस्ते पुरस्कार प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 
     सपोनि. अक्षय सोनवणे यांनी दहिवडी पोलीस ठाण्याचा कारभार स्वीकारल्यापासून या पोलीस ठाण्यातील गुन्हेगारीला आळा बसला आहे. आनेक गुन्हेगारीतील तपास  करत असताना सुद्धा झटपट यंत्रणा राबवत गुन्हेगारांना शोधून काढले तसेच पथदर्शी प्रकल्प राबवत पोलीस ठाणे नेहमीच कामगिरीमध्ये सर्वोत्तम ठेवले आहे. महिला पथदर्शी प्रकल्प असतील यामध्ये पोलीस दिदी  या उपक्रमातून तालुक्यातील शाळांना भेटी देत मुला-मुलींना मार्गदर्शन करण्यात आले. 
    आज देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल पोलीस पाटील व सामाजिक क्षेत्रातील लोकांकडून सपोनि. अक्षय सोनवणे व दहिवडी पोलीस ठाण्याचे सर्व अंमलदार टीमचे अभिनंदन  व शुभेच्छा देण्यात आल्या

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला