जावलीमधील १७ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ५० कोटी आ. शिवेंद्रसिंहराजे; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळवला निधी

सातारा :  सातारा- जावली मतदारसंघात विकसकामांचा झंजावात सुरु ठेवणाऱ्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रस्त्यांच्या कामांसाठी नेहमीच विशेष प्राधान्य दिले आहे. असंख्य रस्त्यांच्या कामांसाठी निधी मिळवणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून सातारा आणि जावली मतदारसंघातील १७ रस्त्यांच्या विशेष दुरुस्तीसाठी तब्बल ५० कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते व पूल परीक्षण व दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत रस्ते दुरुस्ती कार्यक्रम या योजनेतून प्राप्त झाला आहे.

सातारा तालुक्यातील सातारा, गजवडी, चाळकेवाडी रस्ता प्र.जि.मा. २९ कि.मी. ८/०० ते कि.मी. १५/०० (भाग गजवडी ते बोरणे ते राजापुरी फाटा) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी ३ कोटी २० लाख रुपये, शेंद्रे बाह्य वळण रस्ता राज्य मार्ग १४० कि.मी. ५/०० ते कि.मी. ७/०० (भाग सोनगाव कचरा डेपो ते बोगदा)  या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी १ कोटी २० लाख, प्रमुख जिल्हा मार्ग २९ परळी बनघर कूस खुर्द कूस बु. खड्गाव ताकवली निगुडमाळ नित्रळ कातवडी केळवली धनगरवाडी धावली ते प्रमुख जिल्हा मार्ग २६ रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १४४ कि.मी. २६/०० ते कि.मी. ३०/०० (भाग वरची जळकेवाडी ते धावली) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी २ कोटी ५० लाख, प्रमुख जिल्हा मार्ग २९ ते पोगरवाडी आरे दरे रेवंडे वावदरे राजापुरी ते प्रमुख जिल्हा मार्ग २९ रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १४० कि.मी. ८/०० ते १०/६०० (भाग रेवंडे घाट ते वावदरे फाटा), कि.मी. १४/५०० ते १६/५०० (भाग वावदरे ते राजापुरी), कि.मी. १८/०० ते १९/६०० (भाग राजापुरी ते [प्रमुख जिल्हा मार्ग २९) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी ३ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे

 

आसनगाव कुसवडे निनाम सोनापूर गणेशखिंड ते कोंजावडे रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १४६ कि.मी. ०/०० ते २/५०० (भाग आसनगाव ते धनवडेवाडी) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी १ कोटी १० लाख, प्रमुख जिल्हा मार्ग २९ ठोसेघर चिखली जांभे बोपोशी करंजोशी आवर्डे ते प्रमुख जिल्हा मार्ग ८३ रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १३४ कि.मी. ०/०० ते ८/०० (भाग चाळकेवाडी ते जांभे) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी २ कोटी, मर्ढे ते राज्य महामार्ग ४ लिंब, बसाप्पाचीवाडी आरळे पाटखळ वाढे म्हसवे वर्ये नेले धावडशी आकले ते राज्य मार्ग १४० रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १४५ कि.मी. २९/०० ते ३८/३०० (भाग वर्ये किडगाव फाटा ते माळ्याची वाडी ते राज्य मार्ग १४०) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी ३ कोटी, राज्य मार्ग १४० ते कण्हेर वेळे कुसूंबी मोहोट म्हाते खु. वागदरे ते इतर जिल्हा मार्ग ३१ मानेवाडी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग १३९ कि.मी. ०/०० ते ६/०० (भाग कामथी ते मानेवाडी) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी २ कोटी २० लाख, राज्य महामार्ग ४ ते म्हसवे करंजे मोळाचा ओढा शाहूपुरी पोलीस ठाणे मतकर कॉलनी शाहूपुरी चौक ते जुना मेढा रस्ता ते सारखळ प्रमुख जिल्हा मर्ग ११७ कि.मी. २/०० ते ४/४०० (भाग म्हसवे ते करंजे नाका), कि.मी. ७/०० ते १०/५०० (भाग शाहूपुरी ते जिव्हाळा कॉलनी) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी ३ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

सातारा कास बामणोली प्रमुख जिल्हा मार्ग २६ कि.मी. २०/०० ते २१/०० (प्रमुख जिल्हा मार्ग २६ ते कासाणी), कि.मी. २४/०० ते २५/५०० (भाग घाटाई देवी मंदिर ते वांजळवाडी) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी २ कोटी, प्रमुख जिल्हा मार्ग १३५ ते अंबवडे बु. करंजे शिंदेवाडी मस्करवाडी लावंघर अनावळे ते प्रमुख जिल्हा मार्ग ३७ रस्ता प्रजिमा १४१ कि.मी. २/०० ते ६/०० (भाग करंजे ते लावंघर) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी १ कोटी ३० लाख निधी मिळाला आहे. जावली तालुक्यातील भिलार उंबरी धावली आलेवाडी खिंड रेंडीमुरा कुंभारगणी मोरखिंड जननीमाता मंदिर मोरावळे ते राज्य मार्ग १४० कि.मी. २७/७०० ते ३१/००० (भाग रेंडीमुरा फाटा ते कुंभारगणी) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी ३ कोटी, जोर वाई पाचवड मेढा रस्ता प्रजिमा १९ कि.मी. ४४/५०० ते ४६/००, ४६/४०० ते ४७/०००  (भाग कुडाळ ते सावंतवाडी फाटा) आणि ५६/६०० ते ५९/७०० (भाग आलेवाडी घाट ते मेढा) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी २ कोटी ५० लाख, प्रजिमा २६ ते कास एकीव गाळदेव माचूतर प्रजिमा १४८ कि.मी. १६/००० ते २४/५०० (भाग गाळदेव ते खिलारमुरा) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी ४ कोटी ८० लाख, पाचगणी कुडाळ रस्ता प्रजिमा २५ कि.मी. १५/००० ते २२/८०० (भाग सोमर्डी ते कुडाळ) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी ७ कोटी ६० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

महू पिंपळी खर्शी वालुथ हुमगांव इंदवली दरे करंदोशी प्रजिमा १४७ कि.मी. ०/००० ते ३/००० (भाग प्रजिमा २५ ते महू) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी २ कोटी १० लाख आणि भिलार उंबरी धावली आलेवाडी खिंड रेंडीमुरा कुंभारगणी मोरखिंड जननीमाता मंदिर मोरावळे ते राज्य मार्ग १४० प्रजिमा ६८ कि.मी. ८/०० ते २१/०० (भाग तालुका हद्द ते मालदेव खिंड) या रस्त्याची विशेष दुरुस्ती करणेसाठी ५ कोटी निधी उपलब्ध झाला आहे. निविदा प्रक्रिया व इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून कामे तातडीने सुरु करा. कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला