"सायेब...आमच्या बी घराला कुठंतरी हक्काची जागा द्या!"

दहिवडी : दहिवडी ता.माण येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या सौ.मालन काळे यांना दोनदा घरकुल मंजूर होऊन देखील मालकीची जागा नसल्याने ते परत गेले. त्यामुळं भूमिहीन झोपडपट्टीधारकांसाठी अशोक पवार यांनी  प्रशासनाला अर्ज करत 'सायेब... आमच्या बी घराला जागा द्या' अशी साद घातली आहे.

दहिवडीतील अनेक ठिकाणी शासकीय जागेत उभी असलेली शासकीय निवासस्थाने अधिकारी राहत नसल्याने मोडकळीस आली आहेत तर काहींची पडझड झालेली आहे.त्यामुळे त्या इमारती बेवारस असल्यासारख्याच आहेत.त्यात मोकळी सरकारी जागा भरपूर प्रमाणात वापरहीन आहे, तर दुसरीकडे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना घरकुल मंजूर होऊन देखील ते बांधण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध नसल्याने घरकुल योजना माघारी जाऊन त्या योजनेला मुकावे लागत आहे.तसेच सन २०२२ पर्यंत कुणीही बेघर राहू नये यासाठी शासनाने आखलेली आवास योजना लोकांपर्यंत पोहचत आहे,मात्र घर बांधण्यासाठी हक्काची जागा नसल्याने या योजनेचा भूमिहीन लोकांना लाभ घेता येत नसल्याने काय फायदा! असा नाराजीचा सूरही भूमिहीन झोपडपट्टी धारक आळवत आहेत.

त्यामुळे झोपडपट्टीतील लोकांना निर्वासित असलेल्या अन मोकळ्या पडलेल्या जागा घर बांधण्यासाठी द्याव्यात,अन झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना घरकुल सारख्या योजनांचा लाभ घेता यावा म्हणून त्या शासकीय जागेतील अतिक्रमण  नियमानुकूल करण्यात यावे व निवासी घरासाठी(घरकुल बांधणे)साठी जागा मिळावी, अशी मागणी अशोक पवार यांनी उपविभागीय अधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

एकीकडे शासकिय निवासस्थानांची दुर्दशा तर दुसरीकडे  झोपडपट्टीधारकांच्या जगण्याची दशा !

हे चित्र बघून त्या मोकळ्या जागा झोपडपट्टीधारकांना मिळाव्यात यासाठी झोपडपट्टीधारक आग्रही आहेत.

एकीकडे दहिवडीतील मोडकळीस आलेली शासकीय निवासस्थाने आणि ओसाड जागा,तर दुसरीकडे भूमिहीन महिला..."
( छाया : एकनाथ वाघमोडे)

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त