औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायीकांचा सुवर्णकाळ सुरू?
औंध पोलिसांचे सामान्य माणसाला भय, अवैध व्यवसायीकांना मात्र अभय?
अशपाक बागवान - Sun 25th Aug 2024 12:31 pm
- बातमी शेयर करा
औंध : औंध पोलिस ठाणे म्हणजे जणू आधुनिक काळातील सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असा कृत्रिम नियम निर्माण झाला आहे? कि करण्यात आला आहे? ही शंकाच आहे. या ठाण्यातील कारभाऱ्यांच्या इशाराऱ्यावर काम करणाऱ्या "कलेक्टर" शी अवैध व्यवसाय करणाऱ्यांची एकदा जवळीक निर्माण झाली कि समजून जायचे "अपनी तो निकल पडी...." नो एफ.आय.आर..... नो अरेस्ट... डायरेक्ट फैसला १ टू का ५ सुरू आहे?
"सदरक्षणाय खलनिग्रहणाय" ची शपथ दिल्यानंतर लोकशाहीत राजा असलेल्या सर्वसामान्य नागरीकांना न्याय आणि सुरक्षा मिळावी यासाठी याच लोकशाहीच्या राजांकडून कर रूपाने गोळा केलेल्या रकमेतून जनतेने जनतेच्या कल्याणासाठी निवडून दिलेल्या परंतू त्याची बहुदा जाण नसलेले लोकप्रतिनिधी एकत्रित करून निर्माण झालेल्या सरकार कडून जसा प्रत्येक महिन्याच्या १ ते १० तारखेपर्यंत मोबदला ऑनलाईन पद्धतीने संबंधिताच्या पदानुसार थेट खात्यात देण्यात येतो त्याला कदाचित शासनाकडून पगार असेही संबोधले जाते. त्याच धर्तीवर या अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून सुरक्षेसाठी "कलेक्टर" च्या माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत ऑनलाईन अलाऊड नाही ओन्ली कॅश पद्धतीने संबंधिताच्या हातात जमा करून पदानुसार वाटप करण्यात येत असल्यानेच सदरचे अवैध व्यवसाय सुरक्षित सुरू असुन अवैध व्यवसायीकांचा सुवर्णकाळ असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
सध्याच्या पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले मा.समिर शेख ज्यावेळी याच जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत होते त्यावेळी त्यांनी अवैध व्यवसायीकांच्या मुसक्या आवळल्याने ते कर्दनकाळ असलेल्या चर्चा जोमात सुरू होत्या. मग आता पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत असताना अवैध व्यवसाय का? आणि कशामुळे? उभारी घेत आहेत हा यक्षप्रश्न आहे.
औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामस्थ अथवा विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवरांना पोलिस प्रशासनास निवेदन द्यावे लागते हि शोकांतिका आहे. या निवेदन देणाऱ्यांना जे व्यवसाय संविधानाच्या चौकटीतून अवैध वाटतात ते व्यवसाय संबंधित पोलिस प्रशासनाच्या कोणत्या चष्म्यातून वैध असल्याने ते सुरू आहेत? जर त्यांच्याही नजरेतून हे व्यवसाय अवैध असतील तर या अधिकाऱ्यांच्या नावाचा दुरूपयोग करून सुरक्षेची हमी देत अवैध व्यवसायीकां कडून मोबदला रूपी मंथली घेऊन अशी कोणती यंत्रणा कार्यरत आहे? याचाही तपास घेण्याची तसदी संबंधित प्रशासनाकडून होत नसल्याची चर्चा जनमानसात लोकप्रिय होत आहे.
औंध च्या कारभाऱ्यांनी युवकांना कसे उपलब्ध केले "रोज गार" ?सध्याची राजकीय परिस्थिती पाहता दोन गटाला शहर, गांव किंवा वाडी वस्ती अपवाद नाही. मग पुसेसावळी परिसर या शर्यतीत अग्रेसरच. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर तक्रारी, निवेदने देऊनही औंध च्या कारभाऱ्यांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय करणाऱ्या दादा, भाई, भाऊ, शेठ अशा मालकांवर कोणत्याच प्रकारची कारवाई न करता अंगावर गुन्हे घेत तुटपुंज्या रकमेतून उदरनिर्वाह करणाऱ्या जमातीवर मार्च एन्डींग च्या नावाखाली गुन्हे दाखल केल्याचे दिसून येते. मात्र मालक आणि चालक हे जोमाने कामाला सुरुवात करतात. याचाच परिणाम म्हणून जर सुरू असलेले अवैध व्यवसाय बंद होत नाहीत, तर त्यांच्या कडून जो (मोबदला) घेता तोच आमच्याकडून ही घ्या म्हणत बेरोजगार युवकांना नव्याने "रोज गार" उपलब्ध झाल्याने अवैध व्यवसायीकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
#HomeMinisterDevendraFadnavis
#cmomaharashtra\
#homeminister
#satarasp
स्थानिक बातम्या
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Sun 25th Aug 2024 12:31 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Sun 25th Aug 2024 12:31 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Sun 25th Aug 2024 12:31 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sun 25th Aug 2024 12:31 pm
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Sun 25th Aug 2024 12:31 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sun 25th Aug 2024 12:31 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Sun 25th Aug 2024 12:31 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Sun 25th Aug 2024 12:31 pm
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Sun 25th Aug 2024 12:31 pm
-
अजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान
- Sun 25th Aug 2024 12:31 pm
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Sun 25th Aug 2024 12:31 pm
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Sun 25th Aug 2024 12:31 pm
-
सर्वसामान्य जनतेच्या मते औंध पोलिस ठाण्याचे विद्यमान कारभारी अवैध व्यवसायांच्या बाबतीत गांधारीच्या भुमिकेत
- Sun 25th Aug 2024 12:31 pm












