कुरोली येथील यशवंत बाबा यांचा रथ उत्सव मंगलमय वातावरणात
Satara News Team नितीन राऊत
- Thu 7th Jul 2022 05:11 am
- बातमी शेयर करा
वडूज,/ यशवंत हो…जयवंत हो.. गुणवंत हो,,चा जयघोष करीत आश्रम ते सिद्धेश्वर कुरोली गावातून हजारो भाविकांच्या उपस्थितीत आज बुधवारी सकाळी रथ उत्सव सोहळा मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्री यशवंतबाबा महाराजांच्या अठराव्या पुण्यस्मरणानिमित्त या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी श्रींची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. बांधकामाचे कार्यकारी उप अभियंता खलिफे, शाखा अभियंता दादासाहेब खाडे, कृषी अधिकारी श्रीकांत गोसावी, यावेळी सरपंच सौ शीतल देशमुख, यशवंतबाबा आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार गोडसे,यशवंतबाबा देवस्थानचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख,पत्रकार धनंजय क्षिरसागर, विश्वस्त कुमार शेटे,सॊमनाथ साठे, बाबूराव माने, विजयकुमार शेटे,गजानन कुंभार, सुधीर देशमुख संतोष राऊत, दीपचंद भोसलेआदींची प्रमुख उपस्थिती होती.काल ह भ प विजय महाराज शिंदे (लोणीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली काल भर पावसात महारिंगण सोहळा झाला होता. भाविकांनी यशवंत हो… जयवंत हो..चा जयघोष.. टाळ मृदंगाचा गजर करण्यात आला. गावात घरासमोर माता-भगिनींनी रांगोळी काढून भाविकांचे स्वागत केले.सकाळी साडे दहा वाजता रथ उत्सवाला सुरुवात झाली.देणगीदार व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली परमपूज्य योगी यशवंतबाबा मंदिराचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू आहे.

रथाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांचे श्रीफळ व खडी साखर तसेच चहाचा प्रसाद देण्यात आला. तसेच पत्रकार आयाज मुल्ला, मुन्ना मुल्ला, नितीन राऊत, अजित जगताप, राजू फडतरे,दत्ता इनामदार यांचा विश्वस्त मंडळाच्या वतीने नंदकुमार गोडसे, हणमंतराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.गेली दोन दिवस आध्यात्मिक कार्यक्रमाने सिद्धेश्वर कुरोली परिसरात चैतन्याचे वातावरण पसरले होते. परमपूज्य योगी यशवंत बाबा यांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
kuroli
yashvantbaba
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 7th Jul 2022 05:11 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 7th Jul 2022 05:11 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Thu 7th Jul 2022 05:11 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 7th Jul 2022 05:11 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 7th Jul 2022 05:11 am
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Thu 7th Jul 2022 05:11 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Thu 7th Jul 2022 05:11 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Thu 7th Jul 2022 05:11 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Thu 7th Jul 2022 05:11 am













