खंडाळा सेतू घोटाळ्यामुळे जिल्हाधिकारी सातारा यांच्या कार्यालयात महिती अधिकार जनजागृति केंद्र यांच्या वतीने अर्ध नग्न मोर्चाचे निवेदन...

खंडाळा : खंडाळा सेतू घोटाळा प्रकरणातील दोषी घटक घटनांची कसून खाते निहाय चौकशी करून दोषी आहेत त्या सेतू ऑपरेटर यांना निलंबनासह दंडात्मक कारवाई करत नागरिकांचे झाले नुकसान भरपाई  मिळावी असे महिती अधिकार कायदा जनजागृति अभियान केंद्राचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष श्री. सुनीलकुमार बावधनकर यांनी म्हणले आहे.


सविस्तर वृत्त असे की, २८/०५/२०२३ या दिनांकास त्यांच्या मुलाचे शैक्षणिक कामकाजाकामी उत्पन्नाचा दाखला माननीय तहसीलदार साहेब खंडाळा यांच्या कार्यालयातील सेतू विभागात ऑपरेटर मुकेश सपकाळ यांना मागितला परंतु तहसीलदार श्री. अजित पाटील आणि त्यांचे सहकाऱ्यांचे भ्रष्ट कामकाजाबद्दल मागील आठ महिन्यापासून मी पुराव्यासह लेखी तक्रार दाखल केल्यामुळे खंडाळा तहसीलदार, व सेतू घोटाळ्यातील मुख्य आरोपी मुकेश सपकाळ यांनी मला १००० रुपयाची लाच मागितली व  जाणीवपूर्वक हेतू पुरस्कर सदर उत्पन्नाच्या दाखल्याचे कामकाज व इतर कामकाज जाणीवपूर्वक हेतू पुरस्कर दाखल केलेल्या तक्रारी अर्ज विनाकारवाई माघार घेत नाही म्हणून कर्तव्यात कसूर करत अधिकाराचा गैरवापर करून नागरिकांचे कामकाज जाणीवपूर्वक हेतूने पूर्ण करून देत नाहीत. तथा त्यामध्ये टाळाटाळ करून नागरिकांना वारंवार वरिष्ठांकर तक्रार करण्यास भाग पाडतात. 
त्यामध्ये नागरिकांचे दररोजचे हजारो रुपये नुकसान होत असून हे सर्व नुकसान तहसीलदार खंडाळा व त्यांचे इतर कर्मचारी जे डी. एस. सी. वापरतात तसेच सेतू आणि इतर गंभीर भ्रष्ट प्रकरणांची त्यांनी स्वतः पोलखोल केली असून त्याची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांचे आदेशानुसार प्रलंबित असून तहसीलदार खंडाळा व त्यांचा सेतू विभाग हे जाणीवपूर्वक उत्पन्नाचे दाखले प्रलंबित ठेवत इतरांचे जे जास्त शुल्क देतात त्यांचे उत्पन्नाचे दाखले पूर्ण करीत असून रात्री अकरा वाजेपर्यंत भाडे तत्त्वावर डी.एस.सी. वापरणाऱ्या तोतया बोगस तहसीलदारांच्या माध्यमातून जे पैसे व लाच देतील त्यांचे उत्पन्नाचे दाखले दिले जातात व जे पैसे देत नाहीत व लाच देत नाहीत त्यांचे दाखले जाणीवपूर्वक अटकवून ठेवतात. सदर प्रकरणामध्ये खंडाळा तहसीलदार व सेतू ऑपरेटर मुकेश सपकाळ, आदिनाथ देवकाते, सुलतान शेख यांचे विरुद्ध पुराव्यासह लेखी तक्रार दाखल करून तक्रारी झाल्या होत्या. 


या सर्व खंडाळा सेतू घोटाळ्यामुळे खंडाळा तहसिलदार व नागरी सुविधा केंद्र सेतू खंडाळा यांच्या विरोधात दि. ११/०६/२०२४ रोजी जिल्हाधिकारी सातारा यांच्या दालनात अर्धनग्न मोर्चा काढण्यात येणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त