ग्रामपंचायत वडोली निळेश्वर यांच्या मनमानी कारभारा विरुद्ध व ग्रामसेवकावर कारवाईसाठी सुरु असलेले धरणे आंदोलन आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या पुढाकाराने सोडवण्यात आले

कराड ; ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका कोळी मॅडम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून गावातील युवा कार्यकर्ते अविनाश डुबल व त्यांच्या सहकाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. गावातील बोगस ग्रामसभेच्या ठरावाने अपत्र केलेल्या लाभार्थ्यांची घरकुले पात्र करून मंजुरी मिळावी. मागासवर्गीय निधी पंधरा टक्के कुठेही खर्च न करता काढण्यात आलेली बिले याची तपासणी व्हावी. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सीसीटीव्ही बसवणे. ग्रामसेविकेवर कारवाई करणे या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन मागच्या तीन दिवसांपासून चालू केले होते. 


 या आंदोलनास कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासह कराड पंचायत समितीचे बीडिओ प्रताप पाटील व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या समक्ष भेट देऊन आंदोलन स्थागित करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.


 यावेळी बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले गावातील ग्रामपंचायतचा ग्रामसेवक व तलाठी यांचे कामकाज हे डायरेक्ट शासनाच्या मूल्यमापनावरती परिणाम करत असते त्यामुळे ग्रामसेवक किंवा तलाठी यांनी कामांमध्ये हलगर्जीपणा करू नये. तसेच कोणाच्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपले काम प्रमाणिकपणे पार पाडावे. यामध्ये इथून पुढे चुकीचे काही जाणवल्यास निश्चितच त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.यावेळी दयानंद पवार, अमोल पवार,जालिंदर पवार, दीपक पवार, निलेश पवार, हनुमंत पवार, अविनाश डुबल, अक्षय डुबल, प्रजल पवार, गणेश पवार,अक्षय पवार, सुहास पवार, वैभव माने, सुरेश पाटील, बबन पवार, बाबासाहेब पवार, लक्ष्मण पवार, नानासो पवार, विजय पवार, सुनील पाटील, जगन्नाथ वाघमारे, अक्षय वाघमारे, सुधीर वाघमारे, अमोल शेवाळे, जालिंदर वाघमारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला