सावधान, महिलेसोबत चॅटींग करताय

फिशींग चा वापर करून तुम्हाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न
Chatting with women, beware

सातारा : इन्टाग्राम असो किंवा फेसबुक एखाद्या महिलेची रिक्वेस्ट आली की, अनेक तरूणांना, पुरूषांना नकळत आनंद होतो. काही एक विचार न करता थेट रिक्वेस्ट स्विकारली जाते. काही दिवसांनी चॅटींग सुरू होते. बघता बघता ती महिला तुम्हाला कधी जाळ्यात ओढते हे तुम्हालाही कळत नाही परंतु अकाउंट महिलेच असले तरी ते ऑपरेट एक पुरुष करत असतो. आता हे सांगण्याची वेळ आली आहे. नुकत्याच आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात अशाच फिशींग पद्धतीचा वापर करून अल्पवयीन मुलाला जाळ्यात ओढण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इन्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट वायरल करणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचा फोन जप्त करत पुढील तपासाची कारवाई पोलीस करत होते. परंतु फोन जप्त असताना त्यांच अकौंटंवरून आक्षेपार्ह पोस्ट वायरल झाल्याने मुख्य सुत्रधार कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या कारवाई दरम्यान, त्याने फिशींग पद्धतीचा वापर केल्याची माहिती उघड झाली. संशयिताने एका महिलेचे फेक अर्कोट बनवून अल्पवयीन मुलाला इन्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी चॅटींग करण्यास सुरुवात केली. नंतर जाळ्यात ओढून पासवर्ड, आयडी घेत फेक अकाउंट बनवले. या संपूर्ण प्रकाराची माहिती उघड होताच फेक अकाउंटचा वाढता सुळसुळात घातक बनला आहे. त्यासाठी काळजी घेणे आता गरजेचे झाले आहे.

काय आहे फिशींग प्रकार

एखाद्या माशाला जसे जाळ्यात ओढण्यासाठी जसे गळ टाकली जाते तसे सोशल मिडियावर महिलेचा फोटो वापरून तुम्हाला फ्रेंड रेकवेस्ट पाठवली जाते. याला फिशींग असे म्हणतात. नंतर चॅटींग करून ओळख वाढवण्याचा प्रयत्न होतो. तुम्हाला विश्वासात घेत तुमची संपूर्ण माहिती जाणून घेतली जाते. तुम्ही माहिती दिल्यानंतर तुम्हाला जाळ्यात ओढून पैसे मागणे, हनी ट्रॅप सारखे प्रकार केले जातात.

 

महिलांच्या नावाने सर्वात जास्त फेक अकाउंट

सोशल मिडियावर फेक अकाउंटचा सुळसुळात आहे. यामध्ये पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या फेक अकाउंटचे प्रमाण जास्त आहे. या फेक अकाउंटचा वापर करून तरूण मुलांना, पुरूषांना भूरळ घातली जात आहे. इतर जिल्ह्यातील तसेच राज्यातील महिलांचे फोटो फेक अकाउंटसाठी वापरले जातात. यामुळे दिशाभूल होते. त्यातून गुन्हेगारीत ओढण्याचे प्रकार सुरू आहेत

एकदा खात्री करा

कोणत्याही महिलेची रिक्वेस्ट सोशल मिडियावर येताच पहिलांदा त्यांची खात्री करून घ्या. तुमच्या मित्र परिवारातील कोणी तिच्या ओळखीचे आहे का ? हे बघा, त्या मित्राला फोन करून यांची विचारणाही करा आणि मगच ती रिक्वेस्ट स्विकारा यामुळे तुमची वैयक्तिक माहितीचा गैरवापर होणार नाही.

 

फिशींगपासून मुलांनी सावध रहावे, स्वतः प्रत्यक्ष बघितल्याशिवाय किंवा ओळखीचा असल्याशिवाय रिक्वेस्ट स्विकारू नये. चॅटींग करताना आपली कोणतीही वैयक्तिक माहिती, फोटो, व्हिडिओ शेअर होणार नाहीत यांची काळजी घ्यावी जेणेकरून हनी ट्रॅप सारख्या प्रकारात तुम्ही अडकणार नाही. 

किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस उपअधीक्षक, सातारा

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त