पत्रकारांच्या आंदोलनास रयत स्वाभिमानी संघटनेचा पाठिंबा

सातारा  : पत्रकारावरील वाढते हल्ले आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदयाची अंमलबजावणी करण्यात होत असलेल्या कुचराईच्या निषेधार्थ राज्यातील पत्रकारांच्या अकरा प्रमुख संघटनांशी जोडले गेलेले सर्व पत्रकार गुरूवार, दि. 17 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात प्रत्येक शहरात निदर्शने करून पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करणार आहेत, या आंदोलनाला रयत स्वाभिमानी संघटना पूर्णपणे पाठिंबा देत असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांनी म्हटले आहे.                    

 पत्रकारांच्या नियोजित आंदोलनास पाठिंबा देत असल्याच्या प्रसिद्धी पत्रकात श्री. पवार यांनी म्हटले आहे की, 
पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकारास अर्वाच्च शिविगाळ केल्यानंतर आणि चार गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्यानंतरही या प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावले गेले नाही. राज्यातही जेथे जेथे पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना घडतात तेथे तेथे पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम लावण्यास टाळाटाळ होताना दिसते. सन 2019 मध्ये कायदा अस्तित्वात आल्यानंतर जवळपास दोनशे पत्रकारांवर हल्ले झाले, त्यांना शिविगाळ केली गेली किंवा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. 
पतरकार संरक्षक, कायदा करण्यात आला तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकार संघटनेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष विनोद कुलकर्णी तसेच सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सकाळी 11 वाजता त्या त्या तहसील कार्यालयांमध्ये पत्रकारांतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनास रयत स्वाभिमानी संघटना पूर्णपणे पाठिंबा देत असून पत्रकारांच्या मागण्या मान्य व्हाव्यात, म्हणून पत्रकारांच्या संघटनांमार्फत होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात आम्ही सक्रिय आहोत असेही सागर दादापवार यांनी या पत्रकात म्हटले आहे.    

           या प्रसिद्धी पत्रकावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुशीलदादा कदम, जिल्हा सचिव अभय जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप जाधव, तालुकाध्यक्ष तेजस काकडे, जिल्हा उपाध्यक्ष सुमितभाऊ साळुंखे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त