उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांची श्री मदनदादा भोसले यांनी वाई येथील विश्रामगृह येथे घेतली भेट
बापू वाघ (वाई )
- Mon 31st Oct 2022 06:37 am
- बातमी शेयर करा
वाई . बदलत्या काळाचा विचार करता, स्पर्धेच्या युगात टिकाव धरण्यासाठी आणि सुसंस्कारित सक्षम भावी पिढी तयार करण्यासाठी जुन्या शैक्षणिक धोरणात मुलभूत बदल करण्याच्या उद्देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्यावतीने लवकरच नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने नव्या शैक्षणिक धोरणाचा राज्यभर प्रसार करणे, महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांमध्ये त्यातील तरतूदींवर चर्चासत्रे आयोजित करणे आणि कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमाला प्राधान्य देणे आदी बाबींवर माजी आमदार, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मदन भोसले यांनी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
डिजीटल मीडियाच्या अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त भिलार, ता. महाबळेश्वर येथे उपस्थित राहून परत जाताना ना. चंद्रकांत पाटील यांनी वाई विश्रामगृहात मदन भोसले यांचेसह वाई, खंडाळा व महाबळेश्वर येथील प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी मदन भोसले यांनी वरील बाबी मंत्रीमहोदयाच्या निदर्शनास आणून दिल्या. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे हेही उपस्थित होते.
नव्या शैक्षणिक धोरणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने प्रा. विभूते यांनी लिहिलेल्या पुस्तकाची प्रत यावेळी ना. चंद्रकांत पाटील यांना भेट देण्यात आली. यासंदर्भात बोलताना ना. पाटील म्हणाले, राज्यातील शिक्षकांना, प्राध्यापकांना नव्या शैक्षणिक धोरणाची माहिती व्हावी यासाठी विद्यापीठस्तरावर चर्चासत्रे आयोजित केली जात आहेत. त्यातून सर्वांनाच याविषयी माहिती मिळण्यास मदत होणार आहे. कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमालाही प्राधान्य देण्यात येत आहे. जनता शिक्षण संस्थेच्यावतीने किसन वीर महाविद्यालयात लवकरच कौशल्य विकास अभ्यासक्रम विचाराधिन असल्याची माहिती मदन भोसले यांनी दिली.
याप्रसंगी खंडाळा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अनिरुद्ध गाढवे यांनी विनाअनुदानित वरिष्ठ महाविद्यालयाला अनुदान मिळावे यासाठीचे निवेदन दिले. किसन वीर महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबतचे निवेदन दिले तसेच अन्य महत्त्वपूर्ण बाबींवर चर्चा झाली. यावेळी वाई शहर भाजपा, वाई ग्रामीण मंडल, खंडाळा मंडल तसेच भाजपा महिला पदाधिकार्यांनी ना. पाटील यांचे स्वागत केले.
यावेळी वाई अर्बन बँकेचे चेअरमन सीए चंद्रकांत काळे, जिल्हा सरचिटणीस सचिन घाटगे, काशीनाथ शेलार, अविनाश फरांदे, यशवंत लेले, वाई तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, पं.स. सदस्य दिपक ननावरे, सतीश भोसले, अभिजित खंडागळे, शहराध्यक्ष राकेश फुले, सचिन गांधी, वैशाली कट्टे, भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष यशराज भोसले, ईशान भोसले, अथर्व पाटील, मनोज कदम, अलंकार सुतार, गणेश सुतार, विक्रम शिंदे, दिपालीताई पिसाळ, सरचिटणीस ज्योती गांधी, पैलवान नंदकुमार यादव, राजेंद्र धुमाळ, मनोज मालुसरे, गणेश नवघणे, बाळासाहेब मोने, देवानंद शेलार, केशव पिसाळ व अली आगा आदींसह वाई, खंडाळा, महाबळेश्वर येथील भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Mon 31st Oct 2022 06:37 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Mon 31st Oct 2022 06:37 am
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Mon 31st Oct 2022 06:37 am
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Mon 31st Oct 2022 06:37 am
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Mon 31st Oct 2022 06:37 am
टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
- Mon 31st Oct 2022 06:37 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 31st Oct 2022 06:37 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 31st Oct 2022 06:37 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 31st Oct 2022 06:37 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 31st Oct 2022 06:37 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 31st Oct 2022 06:37 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 31st Oct 2022 06:37 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 31st Oct 2022 06:37 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 31st Oct 2022 06:37 am













