जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आयुष विभाग, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

सातारा : दि.२१ जून २०२४ रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे साजरा करण्यात आला.योग दिनाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे , जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर सिव्हिल सर्जन डॉ.युवराज करपे, समाज कल्याण अधिकारी  नितीन उबाळे,जिल्हा आयुष अधिकारी डॉ मिथुन पवार, सहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी, डॉ संजीवनी शिंदे सातारा तालुका गट विकास अधिकारी सतीश बुद्धे महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे राज्यसचिव प्रल्हाद पारटे इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन च्या डॉ. पल्लवी दळवी, मैत्रेय योग च्या संस्थापिका अपर्णा शिंगटे, नितेश भोसले यांचे हस्ते करणेत आले 
     जिल्हा क्रीडाधिकारी नितीन तारळकर यांनी प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत करून योगाचे महत्त्व सांगितले आंतरराष्ट्रीय योग दिन, २०२४ ची थीम स्वतः साठी वं समाजासाठी योग असून शारिरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी तसेच भारताचे संस्कृती व परंपरा यांचा सारासार विचार योग शास्‍त्रात केला आहे. शारिरीक, मानसिक, बौधिक, अध्यात्मिक, सामाजिक व सांस्कृतीक विकासासाठी योग सहाय्यभूत असून, आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या शिष्टाचारानुसार दरवर्षी दिनांक २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
              योग प्रोटोकॉल चे संपूर्ण मार्गदर्शन मैत्रिय योग च्या संस्थापक,योगशिक्षीका अपर्णा शिंगटे यांनी केले.अनुराधा इंगळे यांनी प्राणायाम केले तर हेमांगी पिसाळ, धारा गोहेल,मालती राऊत,शुभांगी पाटील सुवर्ण वाघमारे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविली यामध्ये योगासन पूर्व हालचाली त्यानंतर उभी आसने यामध्ये ताडासन,वृक्षासन, पादहस्तासन,त्रिकोनासान
बैठी आसने यामध्ये वज्रासन,उष्ट्रसान, शशंकासन, मंडूकासन,पोटावरील आसने यामध्ये मकरासन,भुजंगासन,शलभासन ,पाठीवरील आसने यामध्ये  नौकासन, पवनमुक्तासन,उत्तनपदासन,अर्धहलासन,शवासन आदी आसने तर कपळभाति शुद्धीक्रिया,आणि अनुलोम विलोम काकी, भ्रामरी प्राणायाम ध्यान घेणेत आले,यांनंतर व्यसन मुक्तीची शपथ सर्वांनी घेतली.
 योगशिक्षक,योग निसर्गोपचार तज्ञ पूरब आनंदे, अपर्णा शिंगटे , धारा गोयल प्रल्हाद पारटे यांनी प्रात्यक्षिके घेतली सविता कारजकर यांनी सूत्रसंचालन आणि योगाचे मार्गदर्शन केले *नेहरु युवा केंद्र सातारा समन्व्यक देशमुख, सुमित पाटील, सुनील कोळी इंटरनॅशनल नेचरोपॅथी ऑर्गनायझेशन,गाथा योग साधना केंद्र, आर्ट ऑफ लिव्हींग , गुरुकृपा राजयोग चॅरिटेबल ट्रस्ट, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नगर स्थान सातारा, पतंजली योग समिती, हॅप्पी लाईफ फौंडेशन सातारा, महाराष्ट्र योग शिक्षक संघ, सातारा जिल्हा मुदिता योग, , योगग्राम सांबरवाडी, योग विद्याधाम, सातारा विविध योग संस्था माध्यमातून घेणेत आला 
त्याचप्रमाणे सातारा शहरातील शाळेतील विद्यार्थी, राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय खेळाडू, स्काऊट वं गाईड योग साधक यांनी सहभाग घेतला.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त