स्थलांतरीत श्रमिकांची मुले शिक्षणापासून वंचित राहु नये या साठी सरकारने विषेश उपक्रम राबवावा ...खा.श्रीनिवास पाटील
Satara News Team
- Mon 19th Dec 2022 03:47 pm
- बातमी शेयर करा
कराड : स्थलांतरित होत असलेल्या श्रमिकांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, कामाच्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी. यासाठी भारत सरकारने विशेष उपक्रम राबवावा अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी सोमवारी लोकसभेत केली.
लोकसभेत नियम 163 अंतर्गत शेतमजूरांचे जीवन आणि कल्याण सुधारणे या प्रश्नावर चर्चा करताना खा.श्रीनिवास पाटील यांनी ही मागणी केली.
यावेळी खा.पाटील म्हणाले, महाराष्ट्रात साखर संचालक म्हणून मी काम केले आहे. राज्यात साखर कारखान्यांची संख्या मोठी असून तेथे ऊसतोड मजूर राज्याच्या विविध भागातून येत असतात. कामानिमित्त त्यांना वेगवेगळया ठिकाणी अनेक दिवस वास्तव्य करावे लागते. काम संपल्यानंतर ते आपल्या गावी निघून जातात. मात्र त्यादरम्यान त्यांच्या बरोबर येणा-या त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना नसतात. त्यामुळे सदर मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. अशाच प्रकारे अन्य क्षेत्रात काम करणा-या अस्थायी स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा देखील प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद अथवा अन्य मार्गातून त्याठिकाणी शिक्षणा संदर्भातील विशेष उपक्रम संपूर्ण भारतभर राबवला जावा अशी मागणी त्यांनी केली. याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन ही मुले शाळाबाह्य राहणार नाहीत यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असे खा.पाटील म्हणाले.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Mon 19th Dec 2022 03:47 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 19th Dec 2022 03:47 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 19th Dec 2022 03:47 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 19th Dec 2022 03:47 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Mon 19th Dec 2022 03:47 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 19th Dec 2022 03:47 pm
संबंधित बातम्या
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Mon 19th Dec 2022 03:47 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Mon 19th Dec 2022 03:47 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Mon 19th Dec 2022 03:47 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 19th Dec 2022 03:47 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 19th Dec 2022 03:47 pm
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Mon 19th Dec 2022 03:47 pm
-
पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.
- Mon 19th Dec 2022 03:47 pm
-
राज्यात सरकार युतीचे अन् पुसेसावळी जिल्हा परिषद गटात विकास निधीचे श्रेय मात्र भाजपचे?
- Mon 19th Dec 2022 03:47 pm











