मलकापूर पालिकेतील काँग्रेसचे चार नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का

कराड : आगामी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण गटाला मलकापूरमध्ये (जि.सातारा) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मलकापूरचे चार नगरसेवक मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे कराड दक्षिण व मलकापूरमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. येणाऱ्या विधानसभा व मलकापूर पालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने गनिमी काव्याने यश मिळवले, तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपच्या गोटात आणण्यात अतुल भोसले यांनी यश मिळवले आहे.

भोसलेंच्या खेळीने विधानसभेच्या निवडणुकांपूर्वीच पृथ्वीराज चव्हाण यांचे वर्चस्व असणाऱ्या मलकापूर पालिकेतील बांधकाम सभापतींसह चार नगरसेवकांनी भाजपची वाट धरल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. भाजपमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे नगरसेवक भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. पृथ्वीराज चव्हाण गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, 2006 पासून आजअखेर 22 वर्षे मलकापूर पालिकेवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचे वर्चस्व आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू कराड दक्षिणचे काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक निवडणुकीमध्ये येथील जनतेने काँग्रेसला साथ दिली आहे. एकहाती सत्तेमुळे शहराचा चेहरा- मोहरा बदलला आहे.


अनेक नावीन्यपूर्ण योजना येथे राबवल्या गेल्या आहेत. प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांचे यामध्ये योगदान आहे. काँग्रेसला येणाऱ्या निवडणुकांमध्ये पोषक वातावरण आहे. मात्र, चार नगरसेवकांच्या भाजपच्या पक्षप्रवेशामुळे येथील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून, मलकापूरमध्ये काँग्रेसला खिंडार पडणार आहे.

भाजपच्या खेळीकडे लक्ष -
मलकापूर आणि कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजपमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. भाजप आणखी काय खेळी करणार, किती घडामोडी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त