कारखानदारांविरोधात कराड-उत्तर मधून लढवणार निवडणूक: वसिम इनामदार.

शेतकरी संघटनेचा उमेदवार भरणार अर्ज

कराड-उत्तर : ऐन दिवाळीत गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता न दिल्यास विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकरी संघटना घेणार आक्रमक पवित्रा,.शेतकरी संघटनेचा उमेदवार भरणार अर्ज शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसिम इनामदार यांनी कराड उत्तर मधून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. कारण, साखर कारखानदारांनी यंदा दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम केले आहे. त्यामूळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कराड उत्तरचे शेतकरी व संघटना त्यांच्या ताटात 100% माती कालवणार यात शंका नाही. आता खूप झाली उपोषणे, आंदोलने! आता एकच निर्धार विधानसभेमध्ये शेतकऱ्यांचा हिताचा उमेदवार असणार असा निर्धार वसीम यांनी केलाय. कारखाना चालू करण्यापूर्वी उसाचे दर जाहीर करा, शेतकऱ्यांची ऊस बिले कशी देणार आहात ते जाहीर करा, मगच कारखाना चालू करा असा शासनाचा स्पष्ट आदेश असून ही कारखानदारांनी गेले दोन महिने बेकायदेशीर काम चालू कसे केले. त्या विरोधात वसिम यांनी सहा दिवसांचे उपोषण कराड तहसीलदार कार्यालय येथे केले होते. तेव्हा जिल्हाधिकारी साहेबांनी संयुक्त बैठक लावून शेतकऱ्यांना 3100 रुपये दर दहा कारखान्यासहीत जाहीर करावयास लावला होता. त्यामुळे वसिम इनामदार यांच्या प्रयत्नांना यश आले होते. पुणे जिल्ह्यातील कारखाने एफआरपी पेक्षा 700 रुपये दर जास्त देऊ शकतो तर आपल्या जिल्ह्यातले साखर कारखान्यानांनी निदान 500 रुपये चा दुसरा हप्ता तरी काढावा, अन्यथा जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा वसिम इनामदार यांनी दिलाय. आपण लोकप्रतिनिधीना निवडून देतो, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक होतात. परंतु एक ही लोकप्रतिनिधी ऊस दराच्या प्रश्नावर बोलताना दिसत नाही किंवा आंदोलन करताना निदर्शनास आलेले नाही. शेतकऱ्यांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे.शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत या पुढार्‍यांना मते दिली.आणि ह्याच आमदार, खासदारांचे कारखाने,सेवा सोसायट्यां, यांच्याच बँका, तरीही जनतेला लुटायचं काम हे नेते करतायत. यांच्यावर एवढे प्रेम करूनही शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या दरासाठी शेतकरी सातत्याने रस्त्यावर येऊन आंदोलन करत असतात पण त्यांना ह्याच काही सोयर सुतक नाही. मग कशाला हवेत असे आमदार! कारखाना शेतकऱ्यांचा,सभासदांचा असतो, स्वत:च्या ऊस बिलासाठी लाचार व्हायची वेळ आली आहे. म्हणून यावेळी कराड उत्तर मतदारसंघांमध्ये गुलाल सर्वसामान्याचाच,शेतकऱ्यांचाच असणार अशी माहीती शेतकरी संघटनेचे कराड उत्तर अध्यक्ष वसिम एम इनामदार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.



आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त