मुंबईत टोलमाफी; साता-याला का नाही?
Satara News Team
- Wed 16th Oct 2024 04:37 pm
- बातमी शेयर करा
सातारा : मुंबई शहरात प्रवेश करताना लागणारे तब्बल 5 टोल हलक्या वाहनांना माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने सोमवारी घेतला. मुंबईसाठी एक न्याय आणि इतर शहरांसाठी दुसरा न्याय कशासाठी? असा सवाल करत सातारा-कराडातील महामार्गांवर असलेले टोलही वाहनधारकांसाठी माफ करण्यात यावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
मुंबईतल्या 5 प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईत टोलमाफी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. आता राज्यात आणि केंद्रात महायुतीचेच सरकार असताना सार्वजनिक बांधकामाच्या रस्त्यावरील टोलमाफीचा निर्णय राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांसाठीही लागू करण्यात यावा, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
वाहन खरेदी करताना रोड टॅक्स घेतला जातो. तरी देखील विविध कारणांनी वाहनधारकांकडून शासनाकडून आर्थिक वसुली केली जात असते. टोलच्या माध्यमातूनही कर वसुली केली जाते. सातारा जिल्ह्यात तर दोन टोल उभे आहेत. सातारा जिल्हा नीरा नदीपासून सुरु होतो, कराड तालुक्यातील मालखेडपर्यंत जिल्ह्याची हद्द आहे. तसेच जिल्हावासियांना कोल्हापूरला जायचे झाल्यास आनेवाडी, तासवडे आणि किणी असे तीन टोलनाके पार करुन जावे लागते. तर पुणे, मुंबईकडे जायचे झाल्यास तासवडे, आनेवाडी, खेड शिवापूर, मुंबईकडे जाणार्या द्रुतगती मार्गावरील असे चार टोल भरावे लागतात. रस्त्यावर मोठे खड्डे असले तरी सक्तीने टोलवसुली केली जात असते. त्यामुळे वाहनधारकांना सर्वच बाजूंनी कोंडीत पाडण्याचे धोरण पहायला मिळत आहे. कुठेही जाताना वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. त्यामुळे महामार्गावरील टोलनाक्यांबाबत राज्य शासन दुजाभाव करत असल्याचा आरोप आता होताना दिसतो आहे. मुंबईप्रमाणेच कराड, सातार्यातही टोलमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 16th Oct 2024 04:37 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 16th Oct 2024 04:37 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Wed 16th Oct 2024 04:37 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Wed 16th Oct 2024 04:37 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Wed 16th Oct 2024 04:37 pm
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 16th Oct 2024 04:37 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 16th Oct 2024 04:37 pm
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Wed 16th Oct 2024 04:37 pm
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Wed 16th Oct 2024 04:37 pm
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Wed 16th Oct 2024 04:37 pm
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Wed 16th Oct 2024 04:37 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Wed 16th Oct 2024 04:37 pm










