दिवाळी दहा दिवसांवर तरीही फटाके विक्रीची परवानगी नाही.

सातारा : दिवाळी अगदी दहा दिवसावर असताना फटाके विक्रीची परवानगी मिळण्यासाठी विक्रेते शासन दरबारी हेलपाटे मारत आहेत. मात्र अद्यापही त्यांना फटाके विक्रीची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे आर्थिक तोट्यात जाण्याच्या भीतीने फटाके विक्रेते चिंतेत आहेत. तहसीलदारांनी परवानगींना दिल्यामुळे आता रस्त्यावर स्टॉल मारून फटाके विक्री करण्याचा आणि असलेल्या साठ्याबाबत काही घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी अशी भूमिका फटाका असोसिएट ने घेतली आहे

. साताऱ्यातील माची पेठेमध्ये काही दिवसापूर्वी फाटाक्याच्या दारूचा भीषण स्पोट झाला होता. यामध्ये एकाला आपला जीव गमावा लागला होता तर चौघेजण गंभीर झाले होते. या स्फोटानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर संबंधित व्यक्तीने विनापरवाना बेकायदेशीर मार्गाने दारू साठा असल्याचे समोर आले. त्यानंतर प्रशासनाने विनापरवाना फटाके स्टॉलवर कारवाई करण्यास सुरुवात केली काही जणांवर गुन्हे देखील दाखल केले. परंतु जे पूर्वीपासून वर्षं वर्ष शासनाच्या परवानगीने फटाके विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर या कारवाईमुळे अन्याय होऊ लागल्याची भावना फटाका असोसिएशनने व्यक्त केली आहे.

 त्यातच दिवाळी दहा दिवसावर येऊन ठेपली असताना सुद्धा अद्यापही शासनाकडून फटाका विक्री करण्याची परवानगी अजूनही मिळालेली नाही. दिवाळीच्या तोंडावर फटाके विक्रेते हे फटाक्याची ऑर्डर अगोदरच तीन महिने देत असतात. यंदाही मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांकडे फटाके आले आहेत. मात्र विक्रीची परवानगी न दिल्याने एका ठिकाणी फटाके ठेवली आहेत. आणि असे एका ठिकाणी फटाके साठवून ठेवणे धोकादायक आहे. त्यामुळे त्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी असे फटाका विक्रेते असोसिएट चे अध्यक्ष दीपक शिंदे यांनी सांगितले.

 याबाबत साताऱ्यातील सर्व फटाकास्टॉल धारकांनी आ.छ. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त