श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठ साताराच्या शालेय क्रीडास्पर्धेत यशस्वी भरारी...

सातारा :  शिक्षण प्रसारक संस्था करंजेपेठ सातारा संचलित श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजेपेठच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारात अभिनंदनीय कामगिरी केली आहे... शालेय आर्चरी स्पर्धेत १७ वर्ष वयोगटात देवेंद्र जगताप,बॉक्सिंग स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात दिव्यांशु डुबल व यश निकम तर १९ वर्ष वयोगटात ज्युदो खेळप्रकारात प्रथमेश कांबळे यांची राज्यस्तरावर निवड झाली आहे... 

 शालेय स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड झालेले खेळाडू जलतरण खेळ विभागात १७ वर्ष वयोगटातून अनुष्का माळी हिने २०० मीटर बॅकस्ट्रोक व ४०० मीटर फ्रीस्टाइल प्रकारात तर धावणे खेळप्रकारात १७ वर्ष वयोगटातून सोहम चव्हाण याने ८०० मीटर व ४०० मीटर प्रकारात आणि आर्चरी खेळ प्रकारात १७ वर्ष वयोगटातून शिवम चौरासिया या खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे...

 याशिवाय तालुकास्तर कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा मैदानी स्पर्धा, कुस्ती स्पर्धा तर जिल्हास्तर स्पर्धेत आर्चरी, बॉक्सिंग,मल्लखांब व सायकलिंग स्पर्धेतही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग कौतुकास्पद होता...

 विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्धल संस्थेच्या अध्यक्षा वत्सलाताई डुबल, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत,नंदकिशोर जगताप, सचिव तुषार पाटील स्कूल कमिटी चेअरमन प्रतिभा चव्हाण, संचालक प्रतापराव पवार, चंद्रकांत पाटील,हेमकांची यादव,धनंजय जगताप, रविंद्र जाधव यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.... यशस्वी विद्यार्थ्यांना सुशांत साळुंखे व यशवंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले...

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त