रामराजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार

फलटण  : निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच फलटणमध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या असून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि संपूर्ण राजे गट हे दि. १४ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ सोडत शरद पवार गटामध्ये प्रवेश करीत हाती तुतारी घेणार आहेत. 

 आमदार रामराजे नाईक निंबाळकर सध्या तरी शांत राहणार असले तरी महायुतीचा प्रचार ते करणार नाहीत. गेले अनेक दिवस रामराजे व आमदार दीपक चव्हाण हे खासदार शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आपण संजीवराजेंच्या पाठीशी ठाम उभा राहणार असून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही, असे रामराजे यांनी स्पष्ट केले. रामराजे हे विधानपरिषदेचे आमदार असून आणखी कार्यकाळ बाकी आहे. या तांत्रिक अडचण असल्याने ते तूर्त प्रवेश करणार नाहीत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त