साताऱ्यातील 8 मतदारसंघासाठी 36 उमेदवारांच्या मुलाखती थोरल्या पवारांनी घेतल्या.

पुणे : सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून निवडणूक लढू इच्छिणाऱ्यांची संख्या आता 36 वर गेली आहे काल या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पुण्यात खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व आमदार बाळासाहेब पाटील आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित झाल्या. सर्वात जास्त फलटण मधून इच्छुक असून राजेंद्र पाटोळे, अभय वाघमारे, लक्ष्मण माने ,अमोल आवळे, जयश्री आगवणे, वैभव पवार, रमेश आढाव, बुवासाहेब ठोंबरे, डॉ. राजेंद्र काकडे, प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब कांबळे प्राध्यापक डॉ. अनिल जगताप, घनश्याम सरगर, बापूसाहेब जगताप, नंदकुमार मोरे, सूर्यकांत शिंदे ,आशिष सरगर अशा 16 जणांनी मुलाखती दिल्या वाई विधानसभा मतदारसंघातून दत्तात्रय उर्फ बंडू ढमाळ, अनिल जगताप, डॉ. नितीन सावंत, रमेश धायगुडे पाटील, कैलास जमदाडे, यशराज भोसले, निलेश ढेरे अशा सात जणांनी मुलाखती दिल्या. 

 कोरेगाव मधून फक्त आमदार शशिकांत शिंदे हे एकमेवच उमेदवार इच्छुक आहेत. 

 माण मतदार संघातून सूर्यकांत राऊत, नितीन देशमुख, प्रभाकर देशमुख, प्रभाकर घाडगे, अभयसिंह जगताप, अनिल देसाई अशा सहा जणांच्या मुलाखती झाल्या. 

कराड उत्तर मधून आमदार बाळासाहेब पाटील तर कराड दक्षिण मधून सविनय कांबळे यांनी मुलाखत दिली.

 पाटण मधून सत्यजित पाटणकर यांनी तर सातारा जावली विधानसभा मतदारसंघातून दीपक पवार अमित कदम शफिक शेख अशा एकूण सातारा जावली मतदारसंघातुन तीन जणांच्या मुलाखती झाल्या. सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटातून 36 उमेदवारांनी आपल्या कामाचा लेखाजोखा तीन खासदारांच्या समोर मांडला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त