माजी खासदारांनी अकलेचे तारे तोडू नयेत : संजीवराजे नाईक-निंबाळकर

फलटण : फलटण तालुक्यात पाणी प्रश्न आहे न उन्हाळ्यात चांगला स्थापला असून गेल्या काही दिवसात आरोप प्रत्यारोप हे दिसून येऊ लागले आहेत माजी खासदारांनी अकलेचे तारे तोडू नयेत असा घनाघात संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केला आहे.

 कृष्णा खोरे महामंडळाच्या स्थापनेत रामराजे यांचाच पुढाकार होता.असे सांगत त्यांनी कृष्णा खोऱ्यातील पाण्याचा सखोल अभ्यास केला, लवादाचा अभ्यास करून महाराष्ट्राच्या वाट्याचे ९६ टीएमसी पाणी शासनाच्या मदतीने अडवण्यासाठी परिश्रम घेतले. आमचे बंधू विधानसभेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे कृष्णा खोरे प्राणी प्रश्नासाठी ३०-३२ वर्षे काम करतायेत, हे वास्तव महाराष्ट्रासह पाणी प्रश्नाचे ज्ञान असणारे जाणकारही मान्य करतात. आ. रामराजेंचा पाणी प्रश्नी अभ्यास नाही, असे भाष्य करणाऱ्या व रेटून खोटं बोलणाऱ्या माजी खासदारांची व त्यांच्या पाणी प्रश्नी असलेल्या अभ्यासाची कीव करावीशी वाटते. काहीही बोलून माजी खासदारांनी अकलेचे तारे तोडू नयेत, असा घणाघात जि. प. चे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

 पाणी प्रश्नावर आ. रामराजेंचा अभ्यास नाही, त्यांना तांत्रिक ज्ञान नाही म्हणून ते शेतकऱ्यांची दिशाभूल करतायेत, अशा प्रकारचा आरोप प्रसार माध्यमांशी बोलताना माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी केला होता. त्याबाबत पाणी प्रश्नाचे वास्तव प्रसारमाध्यमांना सांगताना संजीवराजे बोलत होते. यावेळी अनिकेतराजे ना निंबाळकर यांची उपस्थिती होती.

 नीरा देवघरचं जास्तीचे पाणी नीरा उजवा व डाव्या कॅनॉलचे लाभार्थीच वापरत होते. ते पाणी लाभ क्षेत्रात गेल्यावर दोन्ही कॅनॉलचे पाणी कमी होणार आहेच. बंदिस्त पाईपलाईनमुळे नीरा देवघरचं वाचणारं पाणी लाभक्षेत्रातच दिलं, तर तेथील सिंचन क्षेत्र ७५-८० टक्क्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल व नीरा उजव्या कालव्यावरील उपसा सिंचन कमी होईल. वाचणाऱ्या पाण्याचा योग्य बॅलन्स केला तरच सर्वांना योग्य न्याय मिळणार आहे. नाहीतर तालुक्याचे मोठे नुकसान होणार आहे. वाचणारे पाणी प्रथम लाभक्षेत्रालाच मिळावे त्यातून राहिलेल्या पाण्याचेच इतरांना देण्याचे नियोजन करावे, असेही संजीवराजे म्हणाले.

 सप्टेंबर २०२१ मध्ये विधान परिषदेचे तत्कालीन सभापती आ. रामराजे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मीटिंगमध्ये झाली होती व निर्णय घेण्यात आला होता. त्या मिटींगला जलसंपदा मंत्री व पुनर्वसन मंत्रीही उपस्थित होते. म्हणजेच नीरा-देवघरच्या बंदिस्त पाईपलाईनचा व ०.९३ टीएमसी पाणी धोम बलकवडीला देण्याचा निर्णय आ.रामराजेंनी अभ्यास करुन दूरदृष्टीने पूर्वीच घेतलेला असतानाही माजी खासदार ते आम्ही केले असे सांगत सुटलेत, असा टोला संजीवराजे यांनी लगावला .

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त