साताऱ्यातील रविवार पेठेत पुतळ्याला साडी घालून सार्वजनिक स्वच्छतागृहा मध्ये ठेवल्याप्रकरणी तीन युवक व एक महिला ताब्यात

सातारा: सातारा शहर परिसरामध्ये रविवार पेठ येथील लोणार गल्ली मध्ये दिनांक 24 12 2023 रोजी रात्रीच्या वेळेस लाईट नसल्याचा फायदा घेऊन आज्ञाताने खोडसळपणे महिलेचा पुतळा साडी घालून सार्वजनिक स्वच्छतागृहा मध्ये ठेवण्याचा आढळून आला होता या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती ही बातमी वाऱ्यासारखी सातारा शहर परिसरात पसरली होती.

 

या बातमीची महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेतली होती. या अनुषंगाने या घटनेचा गांभीर्याने तपास करत सातारा शहर पोलिसांनी घटनेची सविस्तर माहिती घेत एका युवकास ताब्यात घेतले त्या युवकाकडून सदरच्या गुन्ह्याबद्दल माहिती घेतली असता महिलांच्या मनामध्ये भीती उत्पन्न होण्याच्या हेतूने त्याने व त्याच्या दोन युवक व एक महिला साथीदारांनी सार्वजनिक स्वच्छतागृहा मध्ये हा पुतळा ठेवल्याची माहिती दिली. या अनुषंगाने युवकावर व संबंधित दोन व युवक व एक महिला साथीदारांवर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.अशा प्रकारे कोणी गैरकृत्य करेल त्याचेवर कठोर कारवाई करण्यात येईल.असे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.

 

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा.उप.वि. पोलीस अधिकारी साो, किरणकुमार सुर्यवंशी, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक श्री. संदीप जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो. हवा. सुजित भोसले, निलेश जाधव, पो.ना. पंकज मोहिते पो. कॉ. संतोष कचरे, गणेश घाडगे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, सुशांत कदम यांनी केलेली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला