लोकसेवा परिवाराचे कार्य निश्चितच आदर्शवत व प्रेरणादायक - रूचेश जयवंशी

देशमुखनगर :  लोकसेवा परिवाराचे वंचीत समाजासाठीचे कार्य हे निश्चितच आदर्शवत व प्रेरणादायक असून पारधी समाजाच्या उन्नतीसाठी करत असलेल्या कामात शासनाच्यावतीने सर्व सहकार्य करू, असे मत सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी व्यक्त केले.
  लोकसेवा परिवाराच्या आस प्रकल्पातील सातारा व कोरेगाव तालुक्यातील पारधी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी सुरु असणाऱ्या प्रयत्नांची माहिती यावेळी देण्यात आली. हा प्रकल्प आरोग्य, शिक्षण, स्वावलंबन व स्थैर्य या चतु:सूत्री वर आधारित आखला गेला असून प्रकल्पांतर्गत  या दोन्ही तालुक्यातील दहा पारधी वस्त्यांवरील लोकांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात ६९ मुलांचे शैक्षणीक पालकत्व स्वीकारले असून त्यांना शैक्षणिक साहित्य, स्वच्छता किट दिले जाते. त्यांना शाळेत टिकविण्यासाठी चिंचनेर, फडतरवाडी  आणि ब्रम्हपुरी या ठिकाणी दर रविवारी आठवडी शाळा चालविली जाते. तसेच वस्तीवर स्वच्छता मोहीम, महिलांच्या कुटुंबनियोजनच्या शस्त्रक्रिया या गोष्टीही राबविल्या जातात. याचे कौतुक करत जिल्हाधिकारी यांनी पारधी समाजातील नागरिकांचे आरोग्याचे, शिक्षणाचे आणि स्थिरतेसाठी आवश्यक प्रयत्नात प्रशासनाचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांना संस्थेच्या कामाची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. पारधी समाजातील ८० ते ९० टक्के लोकांचे आधारकार्ड, मतदानकार्ड, रेशन कार्ड, जन्माचा दाखला, जातींचे दाखले इत्यादी कागदपत्रे नाहीत. त्यामुळे त्यांना शासकीय सुविधाचा लाभ मिळत नाही, स्वावलंबी होण्यात, मुलांना शिकविण्यात अडचणी येत आहेत ही बाब यावेळी त्यांचे निदर्शनास आणून दिली. त्यावर प्रशासकीय पातळीवर त्यांनी स्वतंत्रपणे पारधी समाजासाठी विशेष अभियान राबविण्यासाठी लोकसेवा परिवारास सहकार्य करू असेही सांगितले. स्वातंत्र्या पूर्वीपासून अडचणीत असलेला समाज सुधारला पाहिजे. त्यांच्या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे तसेच कागदपत्राच्या अडचणी सोडविण्यासाठी लोकसेवा परिवाराकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती घेतली आणि कौतुक केले. आस प्रकल्प हा पारधी समाजाच्या विकासासाठी नियोजनबद्ध आखलेला प्रकल्प असल्याने पारधी समाजातील जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांना मूळ प्रवाहात येण्यासाठी मदत होईल, ही आशाही व्यक्त केली. याप्रसंगी शुभांगी शेडगे, माणिक शेडगे, महेश निकम, विशाल जाधव, विवेक काळे, शेख मॅडम, उपस्तित होते अशी माहिती आस प्रकल्पा चे समन्वयक सुजित काळंगे यांनी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त