७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आ. जयकुमार गोरे यांची दहिवडी बस स्थानकाला सदिच्छा भेट
धिरेनकुमार भोसले
- Mon 3rd Jun 2024 11:24 am
- बातमी शेयर करा
दहिवडी : राज्यात नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दहिवडी बस स्थानकाला सदिच्छा भेट देत परिसराची पाहणी केली.यावेळी आमदार गोरे यांनी बस स्थानकाच्या कामाची इत्यंभूत माहिती जाणून घेत केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल,नगरसेवक रुपेश मोरे,प्रवीण पाटील,प्रल्हाद कबाडे,बाबुराव खाडे यांच्यासह पर्यावरण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान वर्धापन दिनानिमित्त त्यांनी प्रवाशांना पेढे व गुलाब पुष्प देऊन प्रवाशांचे स्वागत केले. गेली ७५ वर्षे अविरत धावणारी लाल परी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यापासूनच चर्चेत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला व ज्येष्ठांना महामंडळाने बस तिकिटात सवलत दिल्याने डबघाईला आलेले महामंडळ पुन्हा सुरळीत होत आहे. विद्यार्थी पास तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यार्थी पासाच्या माध्यमातून परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांना सवलती मिळवून दिल्याने एसटीकडे विद्यार्थी महिला तसेच वयोवृद्धांचा कल वाढू लागला आहे.
गेल्या सहा महिन्यापूर्वी कराड येथून दहिवडीत हजर झालेले आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांनी बस स्थानकाच्या कायापालटासाठी झपाटा लावून अल्पावधीतच बस स्थानकाचा चेहरा मोहरा बदलत बसस्थानक जिल्ह्यात नव्हे तर राज्याच्या शर्यतीत आणल्याची चर्चा जिल्हाभर रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वर्गीय हिंदुॠदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान संपूर्ण राज्यात सुरू होते.यात दहिवडी आगाराने सहभाग घेत 'अ'वर्ग बस स्थानकात जवळपास दहा लाख रुपये लोकसहभागातून जमा करत राज्याच्या शर्यतीत दहिवडी बस स्थानक आल्याने दहिवडी आगाराची चर्चा राज्यात रंगली होती.
#dahiwadibusstand
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 3rd Jun 2024 11:24 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 3rd Jun 2024 11:24 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 3rd Jun 2024 11:24 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 3rd Jun 2024 11:24 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 3rd Jun 2024 11:24 am
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Mon 3rd Jun 2024 11:24 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Mon 3rd Jun 2024 11:24 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Mon 3rd Jun 2024 11:24 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Mon 3rd Jun 2024 11:24 am













