प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांच्या ‘मी भारतीय’ कवितासंग्रहास माणदेशी साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार जाहीर
Satara News Team
- Thu 2nd Feb 2023 04:06 pm
- बातमी शेयर करा
सातारा : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांच्या ‘मी भारतीय’ या कवितासंग्रहास माणगंगा साहित्य परिषद पांगरी येथील माणदेशी साहित्यप्रेमी फौंडेशन फलटण या संस्थेने ‘माणदेशी साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार जाहीर केला आहे अशी माहिती माणदेशी साहित्यप्रेमी फौंडेशनचे कार्यवाह ताराचंद्र आवळे यांनी समाज माध्यमात प्रसारित केली आहे. प्रा. डॉ.सुभाष वाघमारे यांच्या ‘ मी भारतीय’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन तरूण उत्साही लेखक श्रीरंजन आवटे व रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे यांचेह्स्ते २६ नोव्हेंबर २०२२ रोजी भारतीय संविधान दिनी छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे करण्यात आले होते. वर्तमानकालीन प्रश्नांचा वेध घेणारया या कवितासंग्रहास प्रसिध्द साहित्यिक व जेष्ठ पत्रकार संजय आवटे यांची प्रस्तावना लाभलेली असून प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी या कवितासंग्रहातील मुल्य विचारासंबंधी मांडणी केली आहे.या कवितासंग्रहास या पूर्वी श्रीरामपूर येथील प्रतिष्ठानचा देश जागृती पुरस्कार मिळाला आहे. प्रा. वाघमारे यांच्या पहिल्या ‘संविधानाच्या स्वप्नातलं गाव ‘ या कविता संग्रहास एकूण १५ पुरस्कार मिळालेले असून त्यांचे लेखन हे देशात नव्या बदलाची अपेक्षा करणारे आहे. त्यांना माणदेशी साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे सचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील साहित्यप्रेमी प्राचार्य व प्राध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रा.डॉ.सुभाष वाघमारे हे मूळ,मळोली.ता.माळशिरस.जि.सोलापूर गावचे असून महाराष्ट्रातील पुरोगामी वर्तुळातून प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. साहित्यवेल प्रकाशनचे सुमित वाघमारे,डॉ.संजयकुमार सरगडे, प्रा.चंद्रकांत जडगे हरिभाऊ पाटील,प्रा.धनंजय गायकवाड, तारुण्यवेध संघटनेचे विशाल पोखरकर,छत्रपती शिवाजी कॉलेजचा स्टाफ,समता प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते,भीमराव मोरे,तुकाराम लोखंडे, शिवाजी वाघमारे, डॉ.गोरख बनसोडे, फर्ग्युसन कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.प्रकाश पवार, ‘भिनवाडा’ कादंबरीचे लेखक बाळासाहेब कांबळे, प्रा.युवराज खरात,तुषार बोकेफोडे, प्रा.डॉ.आर.ए.कुंभार,सम्यक शाक्यरत्न, प्रा.डॉ.आबासाहेब सरवदे ,मळोली,सातारयातील विचारवंत किशोर बेडकिहाळ, अश्वमेध ग्रंथालयाचे अध्यक्ष रविंद्र भारती झुटिंग,डॉ.राजेंद्र माने,मळवली गावातील हितचिंतक ग्रामस्थ,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते,लुंबिनी संघ सातारा, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथील मराठी विभाग ,माजी विद्यार्थी संघ,शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर,शिक्षक हितकारणी संघटना पुणे,तसेच अनेक साहित्यिक इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.आहे.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 2nd Feb 2023 04:06 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 2nd Feb 2023 04:06 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 2nd Feb 2023 04:06 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 2nd Feb 2023 04:06 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 2nd Feb 2023 04:06 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 2nd Feb 2023 04:06 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 04:06 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 04:06 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 2nd Feb 2023 04:06 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 2nd Feb 2023 04:06 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 2nd Feb 2023 04:06 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 2nd Feb 2023 04:06 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 2nd Feb 2023 04:06 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 2nd Feb 2023 04:06 pm













