इंटर झोनल आर्चरी स्पर्धेचे आयोजन लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय कडे
कोमल वाघ-पवार - Mon 12th Dec 2022 11:42 am
- बातमी शेयर करा
सातारा : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या इंटर झोनल आर्चरी मुला मुलींच्या स्पर्धांचे आयोजन लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाने दृष्टी आर्चरी अकॅडमी सातारा या ठिकाणी नुकत्याच संपन्न करण्यात आल्या या स्पर्धेमधून स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ क्षेत्रातील सातारा,सांगली, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातील आर्चरी खेळाडूंचा सहभाग या ठिकाणी होता.या स्पर्धेमध्ये एकूण 50 ते 55 मुला मुलींच्या आर्चरी खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धा इंडियन राउंड,कंपाउंड राउंड, आणि रिकव्हर राउंड या तीन प्रकारांमध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धेमधूनच शिवाजी विद्यापीठाचा आर्चरी संघांची निवड करण्यात आली. या स्पर्धेतील विजयी खेळाडू शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत पंजाब या ठिकाणी होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी आर्चरी स्पर्धेसाठी ते सहभागी होणार आहेत.या स्पर्धेचे उद्घाटक मा. युवराज नाईक साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. व्ही. शेजवळ तसेच शिवाजी विद्यापीठाचे निवड समितीचे चेअरमन प्रा. समीर पवार, प्रा. विक्रांत सुपूगडे,प्रा. प्रकाश चौगुले तसेच शिवाजी विद्यापीठाचे निरीक्षक म्हणून नियुक्त केलेले डॉ.महादेव सूर्यवंशी सातारा जिल्ह्याचे जेष्ठ शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुनील खरात विविध महाविद्यालयातून आलेले शारीरिक शिक्षण संचालक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.या स्पर्धेचे प्रास्ताविक डॉ.विकास जाधव यांनी केले तसेच या उद्घाटनाचे आभार प्रदर्शन डॉ. अविनाश नलवडे सर यांनी केले. या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये दिनांक 7 डिसेंबर 2022 ते 8 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी सातारा जिल्ह्यातील मलखांब मधील शिवछत्रपती पुरस्कार विजेते मा. सुजित शेडगे सर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक तवर, प्रा.एन.व्ही. शिंदे, प्रा. डी. जी.साळुंखे, तसेच माननीय राजेंद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरणाचा समारंभ करण्यात आला. तसेच विशेष सत्कारमूर्ती म्हणून सौ. सायली प्रवीण सावंत आणि सौ. शैला स्वामी मॅडम यांच्या शुभहस्ते इंटर झोनल आर्चरी मुला मुलींच्या टीम चॅम्पियनशिप देण्यात आली यामध्ये किसनवीर महाविद्यालय वाई यांनी प्रथम क्रमांक मिळवत जनरल चॅम्पियनशिप प्राप्त केली तसेच दुसरा क्रमांक लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाने मिळवत सेकंड जनरल चॅम्पियन चा बहुमान मिळवला. या स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल शिवाजी विद्यापीठाचे संचालक डॉक्टर शरद बनसोडे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.व्ही. शेजवळ यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले डॉ.विकास जाधव शारीरिक शिक्षण संचालक लाल बहादूर शास्त्री यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करत दृष्टी आर्चरी अकॅडमी चे संकल्पक माननीय प्रवीण सावंत यांचे विशेष आभार व्यक्त केले.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 12th Dec 2022 11:42 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 12th Dec 2022 11:42 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 12th Dec 2022 11:42 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 12th Dec 2022 11:42 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 12th Dec 2022 11:42 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Mon 12th Dec 2022 11:42 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 12th Dec 2022 11:42 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 12th Dec 2022 11:42 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 12th Dec 2022 11:42 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 12th Dec 2022 11:42 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 12th Dec 2022 11:42 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 12th Dec 2022 11:42 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 12th Dec 2022 11:42 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 12th Dec 2022 11:42 am













