बोरखळ येथे कार्तिक स्वामी महोत्सवाचे आयोजन
Satara News Team
- Sun 6th Nov 2022 01:13 pm
- बातमी शेयर करा
वडूथ : बोरखळ ता.सातारा येथे श्री कार्तिक स्वामी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी या उत्सवाचे ४४ वे वर्ष असून सर्व गावकरी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करतात.
सालाबादप्रमाणे यावर्षीही जरंडेश्वर कुशीत आणि कृष्णा नदीच्या तीरावरती श्री कार्तिक स्वामी महोत्सव व कृष्णामाई महोत्सव हा कार्यक्रम साजरा होत आहे. त्रिपुरारी पोर्णिमा या दिवशी रविवार दि.०६ आणि सोमवार ०७ नोव्हेंबर रोजी हा महोत्सव साजरा होत आहे. श्री खलवेश्वर मंदिर येथे हा उत्सव साजरा होतो. यामध्ये रविवारी रात्री ७ वाजता बोरखळ गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथांची पालखी श्री खलवेश्वर मंदिरामध्ये वाजत गाजत गावकरी आणतात. त्यानंतर रात्रीपासून पहाटेपर्यंत खलवेश्वर मंदिरामध्ये श्री शिवलीलामृत ग्रंथाचे गावकरी वाचन करतात तद्नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे श्री कार्तिक स्वामींना महाअभिषेक केला जातो. त्यानंतर सत्यनारायणाची पुजा संपन्न होते आणि पुजा झाल्यानंतर सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते त्याचवेळी सायंकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये भजन गायनाचा सुश्राव्य असा कार्यक्रम असतो.त्रिपुरासुर राक्षसाचा वध केल्याचा आनंद भगवान शंकरापुढे वाती लावून म्हणजेच त्रिपुर लावून केला जातो. याचा आनंद म्हणूनच श्री खलवेश्वर मंदिर प्रांगणामध्ये दिवे लावले जातात. कार्तिक पौर्णिमेच औचित्य साधून त्या दिवशी सर्व पंचक्रोशीतील सर्व भक्त-भाविक तसेच महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित राहतात आणि कार्तिक स्वामींचे दर्शन घेतात त्यानंतर सर्व भाविक भक्त-महिला वर्ग नदीमध्ये दिवे सोडतात सर्व उपस्थितांच्या वतीने भक्तिमय वातावरणात कृष्णामाईची आरती होते. अशा प्रकारे दिपोत्सव साजरा केला जातो हा महोत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी गावचे ग्रामस्थ आणि तरुण वर्ग यांचे खुप मोलाचे सहकार्य लाभते.
स्थानिक बातम्या
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sun 6th Nov 2022 01:13 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sun 6th Nov 2022 01:13 pm
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Sun 6th Nov 2022 01:13 pm
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Sun 6th Nov 2022 01:13 pm
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sun 6th Nov 2022 01:13 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Sun 6th Nov 2022 01:13 pm
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Sun 6th Nov 2022 01:13 pm
-
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Sun 6th Nov 2022 01:13 pm
-
नावलीतील जमीन खचल्याच्या घटनेने धोक्याची घंटा; महाबळेश्वर तालुक्यातील ६ गावे भूस्खलनाच्या अत्यंत जोखमीत
- Sun 6th Nov 2022 01:13 pm
-
जावळी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सादिक सय्यद यांची बिनविरोध निवड
- Sun 6th Nov 2022 01:13 pm
-
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Sun 6th Nov 2022 01:13 pm
-
आषाढी वारी पालखी सोहळा आढावा सभा व पालखी मार्ग पाहणी दौरा बैठक.
- Sun 6th Nov 2022 01:13 pm











