प्रवास कोयनेच्या भूमिपुत्रांच्या पराक्रमाचा...

शिवसेना शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री
आज सोनियाचा दिनू... बरसे अमृताचे घनू... आज सोनियाचा दिनू.... हरी पाहिला रे ए..ए..ए..ए हरी पाहिला रे ए..ए..ए..ए आज सोनियाचा दिनू...बरसे अमृताचे घनू... आज सोनियाचा दिनू....

सातारा न्यूज   : मित्रानो वरील गाणे हे आज काहीतरी आनंद झाल्याचे सूचित करत आहे...हो झाला आहे आनंद
घडला आहे इतिहास पराक्रमी जावळी तालुक्यात आणि सातारा जिल्ह्यात
सह्याद्रीच्या पर्वतरांगा मधून खळखळ करत वाहणारी...संपूर्ण महाराष्ट्राला तेजोमय करून सुखमय करणारी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयनानदी...
शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी पराक्रमाची साक्ष देणारे ते गड किल्ले ...घोड्याच्या टापांचे आवाज घुमणारे आणि पराक्रमाची साक्ष देणारे ते सह्याद्रीचे उंच डोंगर आणि याच डोंगर माथ्याच्या पायथ्याला असणाऱ्या त्रिवेणी संगमाच्या काठावर वसलेले एक छोटेसे गाव...
हाताच्या बोटावर मोजण्याइतकी लोकसंख्या आणि त्यात ही ९५% शेतकरी...दिवस भर काम करायचे आणि उधार निर्वाह करायचा हा रोजचा दिनक्रम आणि याच गावतले एका कुटुंबातील एक तरुण नेतृत्व आपला गाव सोडून गजबजलेल्या मुंबई शहरात ठाणे जिल्ह्यात उतरले... फारशी ओळख नाही...भक्कम आधार नाही...परिस्थिती ही बेताची असल्याने कुटुंबाची जबाबदारी ही होतीच आणि या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून स्वतः चे नशीब आणि कुटुंबाचे रक्षण हे दोन्ही करायचे होते...
करायचे तर करायचे काय कारण ओळख नाही पाळख नाही...नक्की कोणता मार्ग धरायचा काहीच कळत नव्हते...पण मराठी माणूस म्हटले की वडापाव गाडा नाहीतर मग... मार किक चल पुढे रिक्षा किंवा टॅक्सी ड्रायव्हर दुसरा उद्योग नाही मग त्या मुलाने विचार केला आणि रिक्षा चालवणे पसंद करत स्वतःला घडवत कुटुंबाची जबाबदारी झेलायला सुरवात केली...
मनात खूप मोठी स्वप्न होती...काहीतरी केले पाहिजे मोठे झाले पाहिजे पण मार्ग मिळत नव्हता रिक्षा चालवायचे काम सुरूच होते आणि त्यामुळे सामाजिक कामाची आवड मनात निर्माण झाली होती त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यात मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना संघटना धर्मवीर आनंद दिघे यांच्या रूपाने कार्य करत होती...येणे जाणे चालू झाले हळू हळू वेड वाढले...
वंदनीय श्री.बाळासाहेब ठाकरे
धर्मवीर आनंद दिघे साहेब
याच्या हिंदुत्व वादी विचाराने आणि जहाल भाषणे यांनी मनावर अधिराज्य गाजवले आणि हे नेतृत्व हळू हळू रिक्षा चालवत.. चालवत सामजिक क्षेत्रात कार्यरत होऊ लागले...सभा आंदोलने...समाज कल्याणचे काम...जनतेसाठी पोलीस कोठडी हे सर्व करत हळू हळू कुटुंबाकडे पाठ फिरवली आणि सामाजसेवेत रुजू झाले ते परत मागे वळून पाहिलेच नाही...
आता तुम्ही विचार करत असाल नक्की कोणाबद्दल लिहले आहे कोण आहे तरी कोण हा मुलगा
एका गरीब शेतकरी कुटुंबातून शांत..प्रेमळ..परोपकारी.. सुसंस्कृत असणारे कुटुंब / जोडपे
श्री.संभाजी शिंदे(वडील)
सौ.गंगुबाई संभाजी शिंदे(आई)
यांच्या पोटी जन्माला आलेले हे रत्न..
नाम तो सूना ही होगा
नामदार श्री.एकनाथ संभाजी शिंदे
सातारा जिल्ह्यातील... महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावात जन्माला आलेले हे कोयनेच्या मातीतील रत्न ...
अनेक स्वप्न उराशी बाळगून आपली जन्मभूमी सोडून स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असणारे आणि कोणत्याही पार्श्वभूमीविना स्वतःला सिद्ध करत राजकीय प्रवास सुरू केलेले

प्रथम...शिवसेना शाखा प्रमुख

 


नंतर...ठाणे जिल्हा प्रमुख
नंतर...नगरसेवक
नंतर...पाचपाखाडी मधून ४ वेळा आमदार
नंतर...विरोधी पक्षनेते
नंतर...दोन वेळा मंत्री मंडळात सहभाग
आणि आज मोठ्या आनंदात आणि अनपेक्षित..
या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात राज्याचे सर्वात महत्त्वाचे पद समजले जाते त्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले
मित्रानो साधे ग्रामपंचायत सदस्य होताना किती अडचणी येतात आणि काय काय करावे लागते हे तुमच्या सारख्या जाणकार मंडळींना वेगळे सांगायची गरज नाही..पण येणाऱ्या सर्व अडचणीवर मात करत एवढे मोठे यश संपादन करणे ही नक्कीच जीवनातील साधी गोष्ट नाही हे आपण सर्वांनी मान्य केले पाहिजे...
तरुण वयात समाजकारणात एंट्री आणि योग्य मिळालेला मार्ग ...मिळालेल्या मार्गाचे केलेले सोने आणि जोडलेली माणस....सर्व सामान्य माणसाचा आधार...दीन दुबळ्याचा वाली...अनाथांचा नाथ...एकनाथ आज खऱ्या अर्थाने पावन झाला
आज त्या जन्म दात्या माऊलीला ही मनोमन आनंद झाला असेल...जिच्या कुशीत या सुपुत्राने जन्म घेतला त्या..
स्व.गंगुबाई संभाजी शिंदे
आज स्वर्गातून आशीर्वाद देत असतील...संतांनी एके ठिकाणी म्हटले आहे
पुत्र व्हावा ऐसा गोंडा
त्याचा तिन्ही लोकी झेंडा
आज ते सत्यात उतरताना दिसले आणि अवघा कोयना विभाग आनंदाने नाचू लागला आनंद अश्रू वाहू लागला...मित्रानो आपण शाळेत असताना एक सुविचार नेहमी सांगत होते कोणता आठवला का...
टाकीचे घाव शोसल्या शिवाय
दगडाला देवपण येत नाही
आज त्याचे प्रत्यय आणि अनुभव सर्वांना येत असेल...नामदार एकनाथ जी शिंदे याचे यश पाहून...अनेक वादळ आली अनेक संकट आली पण हार मानली नाही...कधी कोणावर टीका केली नाही...स्वतःला कधी कमी समजले नाही...आपले काम करत राहिले कारण धेय डोळ्यासमोर ठेवले होते...तिथं पर्यंत पोहचायचे होते...जर हेवे दावे करत बसलो तर तिथं पर्यंत जाता येणार नाही माणस कमवता येणार नाहीत हे साहेबांनी ओळखले होते आणि त्याचा फायदा साहेबाना आज झाला... साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले... आता कोणीही काहीही बोलो कोण म्हणेल की लॉटरी लागली हो लागली लॉटरी पण तिचे तिकीट सुध्दा घ्यायला धाडस केले म्हणून लागली आणि प्रतेकाने हे शिकेल पाहिजे तर आणि तरच आपण आयुष्यात यशस्वी होऊ...
अरे जो जावळी तालुका छत्रपतीच्या पराक्रमाची यशोगाथा सांगतो ज्या भूमीत रक्ताने लिहलेला इतिहास आज ही लोक विसरू शकत नाहीत त्याच भूमीत पराक्रमाची साक्ष देणारे ते गड किल्ले...प्रतापगड
किल्ले...वासोटा
किल्ले...अजिंक्यतारा
मोठ्या दिमाखात ३५० वर्षा नंतर ही उभे आहेत त्याच धर्तीवर त्याच पराक्रमी जावळीच्या खोऱ्यात... आज पुन्हा एकदा मराठ्यांने इतिहास लिहला आणि गरीब शेतकरी कुटुंबातून उदर निर्वाहासाठी ठाणे जिल्ह्यात आलेला हा रिक्षा चालक आज महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला हा.आहे इतिहास पराक्रमी जावळी तालुक्याचा
मित्रानो आपण नेहमी बोलता...बोलता बोलून जातो 
एक चहा विकणारा मुलगा भारताचा पंतप्रधान झाला
आज तुम्ही आनंदाने सागा..
एक रिक्षा चालवणारा मुलगा कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी  नसताना फक्त...बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद दिघे याची साथ स्वतः चे कर्तुत्व या जोरावर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला
नाम तो सूना ही होगा...
नामदार एकनाथ संभाजी शिंदे
मित्रानो सर्वांच्याच नशिबी हे नसते १०० रात एखादा आपले नशीब अजमवू शकतो नाहीतर आजुन ही त्या काळचे कट्टर शिवसैनिक लाईन मध्ये उभे आहेत पण त्या साठी लागते स्वकर्तृत्वव...
जनतेचे आशीर्वाद...जनतेचे प्रेम...जनतेप्रती आस्था...आपल्या सामाजासोबत जोडलेली नाळ...आठवणीत असावे लागतात ते आपले जुने दिवस... जीवनात जोडलेली मानस सांभाळून ठेवणे... त्यांना आपले मानने...कुटुंबाची साथ ....आणि त्याही पुढे जाऊन सांगतो....आपल्या जन्म दात्या आई वडिलांचे आशीर्वाद कायम पाठीशी असणे गरजेचे असते जे नामदार एकनाथ जी शिंदे यांच्या होते... आणि म्हणून आजचे यश हे त्याचे फळ आहे असे ठाम सांगतो
शेवटी एकच सांगेन...साहेबांनी घेतलेली ही राजकारणातील उंच भरारी हे अवघ्या महाराष्ट्रासह
१०५ गाव समाज मधील समस्त कोयना सोळशी आणि कांदाठी विभागातील जनतेसाठी अभिमानाची गोष्ट आहे
हे आपल्या भागाला मिळाले राजकीय वैभव परत मिळेल की नाही हे मी तरी सांगू शकत नाही...
पण एक गोष्ट हक्काने नमूद करतो भागाचा कोणताही राजकीय सपोर्ट शिंदे साहेबाना नसताना आज त्यांनी जे भागाच्या विकासासाठी केले ते ज्यांना आपण आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांनीही केले नाही काही अपवाद वगळता...आणि काय काय केले हे वेगळे सांगायची गरज नाही मग कोरोना असेल...जनतेला मदत असेल...असे अनेक मुद्दे आहेत आणि म्हणून आज तर आपला कोयनेच्या मातीतील सुपुत्र महाराष्ट्र राज्याच्या सर्वाच्च पदावर विराजमान झाले आहेत त्यामुळे ते त्याच्या स्वप्नातील कोयना विभाग बनविल्या शिवाय राहणार नाहीत हे मात्र निश्चित आहे...
आणि म्हणून मी एक सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून...या कोयनेच्या मातीतील यशस्वी सुपुत्राला
मा.ना.श्री.एकनाथ जी शिंदे - साहेब
( मुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य )
यांना पुढील राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त