बिबट्याने पोल्ट्रीत घुसून पाडला अनेक कोंबड्यांचा फडशा.

बनपुरीच्या भालेकर वाडीतील घटना.. नागरिक त्रस्त

बनपुरी  : बिबट्या पोल्ट्री फार्म मध्ये घुसला.. आणि त्याला कोंबड्यांचा थवाच दिसला.. बिबट्याने पोल्ट्रीत घुसून पाडला अनेक कोंबड्यांचा फडशा.. बनपुरीच्या भालेकर वाडीतील घटना.. नागरिक त्रस्त

बनपुरी येथील भालेकर वाडीत भर वस्तीत असलेल्या पोल्ट्री फार्म मध्ये बिबट्याने घुसून अनेक कोंबड्या फस्त केले आहेत गेल्या काही दिवसापासून बिबट्याच्या धुमाकूळाने त्रस्त असलेला बनपुरी परिसर आणखीनच धास्तावला आहे बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा बसवण्याची मागणी करूनही वन विभागाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत 

बनपुरी परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे पाळीव जनावरांबरोबरच कुत्री शेळ्या वासरे बिबट्याने फस्त केले आहेत याबाबत पिंजरा बसवण्याची मागणी वनविभागाकडे केली होती तसेच मोर्चाचा इशाराही देण्यात आला होता पिंजऱ्याऐवजी वनविभागाने काही दिवस कॅमेरे बसवले मात्र बिबट्या फिरकलाच नाही ते कॅमेरे काढल्यानंतर चौथ्या दिवशीच भालेकर वाडीतील ज्ञानदेव श्रीरंग भालेकर यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये घुसून बिबट्याने अनेक कोंबड्या फस्त केल्या बिबट्याने शेड ची तारेची जाळी फाडून आत प्रवेश केला व कोंबड्यांचा फडशा पाडला सकाळी सहा वाजता काही कोंबड्या मृतावस्थेत बाहेर पडल्याचे आढळून आले याबाबतची माहिती मिळताच वनपाल शशिकांत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश सुतार अश्विन पाटील अजय कुंभार हरीश बोत्रे अजय सुतार आदींनी पाहणी केली जिथे ही घटना घडली त्या परिसरात लोक वस्ती तसेच उसाची शेती आहे तसेच जनावरांचे शेडही असल्याने काळजीचे वातावरण आहे पोल्ट्री मध्ये 40 ते 50 दिवसात तयार होणारे 2200 पक्षी होते हल्ल्यातून बचावलेल्या अनेक कोंबड्या घाबरल्याने त्यातील काही दगावण्याची भीती व्यक्त होत आहे दरम्यान घटनास्थळ परिसरात कॅमेरे बसवण्याची कार्यवाही सुरू होती मात्र पिंजरा बसवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला