भाजपा सदस्यता नोंदणीत सहभागी व्हावे – सौरभबाबा शिंदे

सदस्यता नोंदणी महाअभियानाचा कुडाळ जिल्हा परिषद गटात शुभारंभ

कुडाळ : सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम तसेच सातारा जावली विधानसभा संयोजक श्री अविनाश दादा कदम यांच्या सहकार्याने प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, व पंचायत समिती जावलीचे माजी उपसभापती सौरभबाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कारखाना कार्यास्थळावर कामगार आणि कार्यकर्त्यांच्या ऑनलाईन भाजपा सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, उद्योग आघाडीचे दिपक गावडे, प्रतापगडकारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे, शुभम महामुलकर, यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि प्रतापगडसहकारी साखर कारखान्याचे कामगार उपस्थित होते. यावेळी प्रत्येक कामगारांच्या व कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरून 8800002024 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल करून भाजपचे प्रार्थमिक सदस्य करून घेण्यात आले. 

   सर्वांच्या मोबाईल मध्ये Namo app डाउनलोड करून त्याच्या माध्यमातून सदस्यांची प्रार्थमिक सदस्य नोंदणी करताना सर्व माहिती भरून घेण्यात आली. कुडाळ जिल्हा परिषद गटात प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन सभासद नोंदणीचे उदिष्ट पूर्ती साठी भाजपा गाव चलो अभियानाच्या राथाचे उदघाटन सौरभ बाबा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रथ गावोगावी जाऊन भाजपाच्या सदस्य नोंदणीचे काम करणार आहे. तालुक्यातील युवक, वृद्ध, लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र आता थांबणार नाही ही टॅग लाईन घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच सक्षम महाराष्ट्र घडविण्यासाठी जावळीतील सर्व मतदार बंधू भगिनींनी व समस्त नागरिकांनी भाजपचे सदस्य होण्याचे आवाहन यावेळी सौरभबाबा शिंदे यांनी केले. सदस्यता नोंदणीसाठी ऑनलाईन काहीही अडचण आल्यास गावोगावच्या कार्यकर्त्यांनी संपर्क करण्याची विनंती तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे यांनी केली. तसेच सौरभबाबा शिंदे यांनी भाजपा सदस्यता नोंदणीचे अभियान सर्व सहकार्यांच्या मदतीने ताकतीने राबवून आवश्यक ते उदिदष्ठ साध्य करणार असल्याचे सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त