कोरोना काळात आर्थिक गैरव्यवहाराची याचिका दाखल करते दीपक देशमुख यांच्या घरावर 'ईडी'चा छापा
Satara News Team
- Fri 2nd Aug 2024 03:52 pm
- बातमी शेयर करा

मायणी : खटाव तालुक्यातील मायणी येथील मायणी मेडिकल कॉलेजचे सर्वेसर्वा देशमुख कुटुंबियांची चौकशी करण्यासाठी शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ईडीचे पथक मायणीत दाखल झाले. देशमुख कुटुंबातील सदस्यांची चौकशी सकाळी सहापासून सुरू होती. चौकशीदरम्यान कागदपत्रे तपासणी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात दोन-तीन वर्षांपासून ईडीची चौकशी सुरू आहे. चौकशीअंतर्गत सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख व त्यांचे बंधू आप्पासाहेब देशमुख हे सुमारे दीड वर्षापासून अटकेत आहेत. तेव्हापासून या कुटुंबाची वारंवार चौकशी केली जात आहे. कागदपत्रे तपासणी, उलट तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाच शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ईडी पथक पुन्हा एकदा देशमुख कुटुंबीयांची चौकशी करण्यासाठी मायणीत दाखल झाले आहे.
या चौकशीत कुटुंबातील सदस्य व कागदपत्रांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, सकाळपासूनच अधिक वेळ ईडीचे अधिकारी देशमुख कुटुंबीयांच्या शिंदेवाडी रस्त्यालगत असलेल्या घरामध्येच असल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
चौकशी लावण्यात आल्याची चर्चा
मायणीतील मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष हे माणचे आमदार जयकुमार गोरे आहेत. या कॉलेज अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची याचिका आमदार गोरे यांच्याविरोधात दीपक देशमुख यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळेच ही चौकशी लावण्यात आल्याची चर्चा परिसरात सध्या सुरू आहे.
स्थानिक बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Fri 2nd Aug 2024 03:52 pm
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Fri 2nd Aug 2024 03:52 pm
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Fri 2nd Aug 2024 03:52 pm
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Fri 2nd Aug 2024 03:52 pm
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Fri 2nd Aug 2024 03:52 pm
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Fri 2nd Aug 2024 03:52 pm
संबंधित बातम्या
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Fri 2nd Aug 2024 03:52 pm
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Fri 2nd Aug 2024 03:52 pm
-
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Fri 2nd Aug 2024 03:52 pm
-
कराडात काँग्रेसला धक्का! बडा नेता जाणार अजितदादांच्या पक्षात?
- Fri 2nd Aug 2024 03:52 pm
-
माजी खासदारांनी अकलेचे तारे तोडू नयेत : संजीवराजे नाईक-निंबाळकर
- Fri 2nd Aug 2024 03:52 pm
-
संजय राऊत, रोहित पवार अन् 'त्या' पत्रकारावर हक्कभंग; विधानसभेत जयकुमार गोरे भावूक
- Fri 2nd Aug 2024 03:52 pm
-
2019 साली त्याचा निकाल लागला कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं ; जयकुमार गोरे
- Fri 2nd Aug 2024 03:52 pm
-
दहिवडी नगरपंचायतीच्या सभापती निवडी जाहीर;जाधव,पवार यांना संधी
- Fri 2nd Aug 2024 03:52 pm