सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवण्याची गरज नाही....आमदार शिवेंद्रसिंहराजे
Satara News Team
- Wed 24th Apr 2024 01:17 pm
- बातमी शेयर करा
सातारा : देगाव एमआयडीसीचे शिक्के उठवणाऱ्यांनी सातारकरांचे आधीच नुकसान केले आहे. या बाहेरच्या लोकांनी येऊन सातारकराना स्वाभिमान शिकविण्याची गरज नाही असा प्रहार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.
शेंद्रे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा सोनगाव येथील सप्तपदी कार्यालयात झाला. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले, माजी सभापती सुनील काटकर अरविंद चव्हाण बाजार समितीचे सभापती विक्रम पवार माजी नगराध्यक्ष रंजना रावत विजय पोतेकर संपतराव साळुंखे सुरेंद्र देशपांडे संजय पोतेकर सूर्यकांत पडवळ विश्वास नावडकर प्रशांत पोतेकर सुनील जाधव संजय साळुंखे अजिंक्यतारा सूतगिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर नामदेव नावडकर एडवोकेट अंकुश जाधव मोहनराव साळुंखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या संघर्षानंतरही आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. खासदार उदयनराजे आणि माझ्यात कुठलेही राजकीय सेटिंग झालेलं नाही तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातारा तालुक्यामध्ये जी विकास कामे झाली आहेत. तीच विकास कामे अधिक गतीने पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा भाजपला सत्तेवर आणायचे आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उदयनराजेंच्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत त्यांनीच विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करून महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात देगाव एमआयडीसीला खो घातला होता. साताऱ्याच्या प्रगतीच्या उभे राहिले आहेत आता त्यांच्या विरोधात उभे राहण्याची वेळ आलेली आहे. सातारा तालुक्यात आपली स्वतंत्र ताकद आहे. आता विकासाच्या आड येणारे सातारकरांना स्वाभिमान शिकवत असतील तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याची वेळ आलेली आहे.
घटना बदलण्याबाबतचा चुकीचा प्रचार विरोधी नेत्यांकडून सुरू आहे वास्तविक मोदी शहा यांनी घटनेला हात लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मते मिळवण्यासाठी आंबेडकर प्रेमी जनतेला फसवण्याचे काम हे विरोधक करत आहेत, अशी टीकाही शिवेंद्रसिंहराजे यांनी केली.
हीच एकी कायम राहणार..
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातारा शहरासह तालुक्याचा विकास करायचा आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलेली एकी पुढे विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच गाव पातळीवरील निवडणुकांत देखील कायम ठेवायची आहे, असे सुतोवाच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भाषणात केले.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 24th Apr 2024 01:17 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 24th Apr 2024 01:17 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 24th Apr 2024 01:17 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 24th Apr 2024 01:17 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 24th Apr 2024 01:17 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 24th Apr 2024 01:17 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Wed 24th Apr 2024 01:17 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 24th Apr 2024 01:17 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Wed 24th Apr 2024 01:17 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Wed 24th Apr 2024 01:17 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Wed 24th Apr 2024 01:17 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Wed 24th Apr 2024 01:17 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Wed 24th Apr 2024 01:17 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 24th Apr 2024 01:17 pm












