प्रतापगड कारखान्यामुळे जावलीत सहकारक्रांती घडेल आ. शिवेंद्रसिंहराजे; आगामी गळीत हंगामासाठी मशिनरी दुरुस्तीस प्रारंभ
Satara News Team
- Thu 8th Jun 2023 04:27 pm
- बातमी शेयर करा
सातारा- जावली तालुका हा डोंगराळ आणि दुर्गम प्रदेश म्हणून ओळखला जातो. या भागाचा सर्वांगीण विकास साधताना येथील शेतकरी आर्थिक सक्षम झाला पाहिजे, याच उद्देशाने अजिंक्यतारा कारखान्याने प्रतापगड कारखाना भागीदारी तत्वावर चालविण्यास घेतला आहे. प्रतापगड कारखाना सुरु करून आगामी गळीत हंगामात ४ लाख मे. टन उसाचे गाळप केले जाईल आणि हंगाम यशस्वीपणे संपन्न होईल. प्रतापगड कारखान्यामुळे जावली तालुक्यात खऱ्या अर्थाने सहकारक्रांती घडेल, असा विश्वास अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
प्रतापगड कारखान्याला उर्जितावस्था प्राप्त व्हावी, या कारखान्याच्या सभासद, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या हेतूने आणि सामाजिक बांधिलकी म्हणून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने प्रतापगड कारखाना १५ वर्षांच्या कालावधीसाठी भागीदारी तत्वावर चालविण्यास घेतला आहे. आगामी २०२३- २४ च्या गळीत हंगामात प्रतापगड कारखाना ४ लाख मे. टन ऊस गाळप करणार असून कारखाना सुरु करण्यापूर्वी कारखान्यातील मशिनरी दुरुस्ती आणि देखभालीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, व्हा. चेअरमन शिवाजीराव मर्ढेकर, अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, प्रतापगडचे कार्यकारी संचालक राजेंद्र भिलारे यांच्यासह दोन्ही कारखान्याचे सर्व संचालक, प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सौरभ शिंदे व उपस्थित सर्व संचालक यांच्या समवेत कारखान्याची पाहणी केली. २०२३- २४ च्या हंगामात कारखाना कार्यक्षेत्रामधून उसाची उपलब्धता विचारात घेता ४ लाख मे. टन उसाचे गाळप करून हंगाम यशस्वीपणे संपन्न करण्याचा मनोदय दोन्ही व्यवस्थापनाचा आहे. कारखाना पूर्ण क्षमतेने चालावा यासाठी कारखान्यातील मशिनरी दुरुस्ती आणि देखभालीचे काम हाती घेण्यात आले आहे. अजिंक्यतारा कारखान्याच्या सहकार्याने प्रतापगड कारखान्याला पुन्हा उर्जितावस्था प्राप्त होईल आणि या संस्थेच्या माध्यमातून जावली तालुक्यातील शेतकऱ्यांना उभारी मिळेल, असे आ.शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 8th Jun 2023 04:27 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 8th Jun 2023 04:27 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 8th Jun 2023 04:27 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 8th Jun 2023 04:27 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 8th Jun 2023 04:27 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 8th Jun 2023 04:27 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Thu 8th Jun 2023 04:27 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 8th Jun 2023 04:27 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Thu 8th Jun 2023 04:27 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Thu 8th Jun 2023 04:27 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Thu 8th Jun 2023 04:27 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Thu 8th Jun 2023 04:27 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Thu 8th Jun 2023 04:27 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 8th Jun 2023 04:27 pm













