पक्ष बदलून जर आणि गुन्हा केलाय तर,,, हो केलाय गुन्हा आमदार मकरंद आबा पाटील,

पक्ष बदलण्यावरून स्पष्टीकरण: उडतरेत विकास कामांचे भूमिपूजन,

वाई: कारखान्याच्या जबाबदारीने आपण पक्ष बदलला 467 कोटी रुपये अजितदादांनी कारखान्यासाठी दिले, शेतकऱ्यांच्या प्रपंच्यासाठी आम्ही जर पक्ष बदलून गुन्हा केला असेल तर हो केलाय आम्ही गुन्हा, दादांनी काकाला खासदार केले दिलेला शब्द पाळला दादा जो शब्द देतात तो पुर्ण करतात हा इतिहास आहे,म्हणून जसे आजपर्यँत मला चढत्या क्रमाने या गावाने मतदान केले तसेच उद्याच्याही निवडणूकित असेच प्रेम ठेवावे,असे प्रतिपाद आ मकरंद पाटील यांनी केले. 

 उडतरे ता वाई येथे विविध विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी व खा नितिनकाका पाटील यांच्या नागरी सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते, यावेळी खा. नितीनकाका पाटील, बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, किसनवीर कारखाना उपाध्यक्ष प्रमोद शिंदे,प्रतापराव पवार आण्णा, कांतीलाल पवार, शिवाजी बाबर, जनता बँकेचे अध्यक्ष बळीराम जगताप,राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस निवास शिंदे,आत्माराम सोनावणे, विजय शिंगटे,मनोजभाऊ पवार,सरपंच अर्चना पवार, उपसरपंच चंद्रकांत बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती,

 आ पाटील म्हणाले,सर्वार्थाने चांगलं गाव म्हणून उडतरेकडे पाहिले जाते, राजकारण कसेही असुद्या पण चांगल्या विचाराने चालणारे गाव आहे, चढत्या क्रमाने मला मतदान दिल्याने मी तीन वेळा आमदार झालो, या गावात आलो की आपल्या गावात आल्यासारखं वाटत इतकं प्रेम आमच्या कुटुंबावर या गावाने केले,येणाऱ्या दोनच दिवसात आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी घेणार असून त्यामुळे कित्येक वर्षाचे गावचे स्वप्न पुर्ण होणार आहे, खा नितिनकाका पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले, जिल्ह्याच्या नेतृत्वात जी पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्यासाठी अजित दादांनी मला भविष्याचा विचार करून राज्यसभेत संधी दिली असे मला वाटते,त्यामुळे ही पोकळी भरून काढतांना मी माझ्या कुवतीप्रमाणे निश्चित माझ्या प्रत्येक कार्यकर्त्यांना बळ देईन,आबांच्या रूपाने भाविष्यात राज्याच्या राजकारणात संधी मिळणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी अजित दादा व आबांना मतदानाच्या रूपाने बळ द्यावे,

 प्रास्ताविकात मोहन पवार यांनी आबांनी आपल्या गावचे 50 वर्षाचे भविष्य बघितले आहे, आता पुढील काळात नितिनकाकांनी तात्यांची जागा भरून काढावी,आम्ही कायमच आपल्या पाठीशी असून तुम्ही दिलेली प्रचंड विकासकामे आम्ही भरघोस मतदानाच्या रूपाने तुम्हाला देऊ, यावेळी प्रमोद शिंदे,प्रतापराव आण्णा पवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली, याप्रसंगी गावातील विविध ठिकाणची जवळपास 11कोटी 33लाख रुपयांच्या कामांची भूमीपूजन करण्यात आली, तर गावातून आ व खासदार बंधूची भव्य मिरवणूक देखील काढण्यात आली, उडतरे ग्रामस्थांच्या वतीने खासदार श्री नितीन काका पाटील यांना सन्मानचिन्ह देऊन भव्य नागरी सत्कार करण्यात आला, विजय जगताप,मोहन पवार, सुप्रिया पवार, अजना जगताप, सुरेखा जगताप, प्रकाश पवार, अश्विनी बाबर, शेला बाबर,नारायण जाधव,राहूल शिंदे, नारायण जाधव,प्रदिप बाबर, संजय जगताप,मारुती पवार,सचिन पवार, धनंजय पवार, विलास बाबर,सुरेश बाबर,जितेंद्र जगताप,राजेंद्र जगताप, बळीराम जगताप,दन्तात्रय पवार, स्वप्नील निंबाळकर,शिवाजी बाबा, दत्तात्रेय गुजर,चंद्रकांत जगताप,विजय जगताप,गणेश बाबर,रुपेश बाबर, संतोष पवार (पाटील),विठ्ठल फरांदे, विजय जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते, सूत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले तर आभार शिवाजी बाबर यांनी मानले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त