बाळासाहेबांची शिवसेना शहर कार्यकारणीत नवे चेहरे

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान

सातारा : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराचा वारसा सांगणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या शहर कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली आहे . या कार्यकारणीत नवनियुक्त सदस्यांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली जिल्हा शिवसेनाप्रमुख पुरुषोत्तम जाधव जिल्हा संपर्कप्रमुख शरदराव कणसे शिवसेना शहर प्रमुख निलेश मोरे व उपतालुकाप्रमुख अमर बेंद्रे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. 
सातारा शहराची झालेली हद्दवाढ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नामुळे सातारा शहरात लागू झालेली विकास कामे यांचा सातत्याने पाठपुरावा तसेच शिवसेनेची पाळेमुळे सातारा शहर आणि जिल्ह्यामध्ये घट्ट करण्यासाठी शहर कार्यकारणीत मध्ये नवीन चेहरे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार ही पुनर्रचना करण्यात आल्याचे शहर प्रमुख निलेश मोरे यांनी सांगितले आहे तसेच सातारा शहरातील समस्या आग्रहाने प्रशासनाकडे मांडून त्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आल्याचे निलेश मोरे यांनी सांगितले .
 या नियुक्ती पत्रांचा प्रधान सोहळा पालकमंत्री शंभूराजे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये हिंदुत्वाचा प्रखर विचार सांगणारी बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी त्यांच्या विचारांची वारसदार असून राज्य सरकारने नेहमी सातारा जिल्ह्यासाठी विकासात्मक प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे . कार्यकर्त्यांना पाठबळ देणे आणि त्यांच्या कार्य कक्षा रुंदावणे ही काळाची गरज आहे त्यामुळे जनमानसात जाऊन काम करणारे नवीन चेहरे कार्यकारणीत समाविष्ट करण्यात आले आहे त्यांच्या माध्यमातून शिवसेनेचा विचार सर्वसामान्य पर्यंत पोहोचवला जाईल असे शंभूराज देसाई यांनी सांगितले. 

शहर कार्यकारणी पुढील प्रमाणे 

अमोल सुभाष इंगोले सातारा शहर संघटक, शुभम रमेश भिसे सातारा शहर संघटक, अभिजीत बबनराव सपकाळ उपशहर प्रमुख ,अमोल श्रीपती खुडे उपशहर प्रमुख, निलेश विलासराव आपटे उपशहर प्रमुख, सयाजी मारुती शिंदे, मनोज दिवाकर भोसले, मयूर बाबुराव करवले, शरद तानाजी कुसबे, जयकुमार महादेव बेंद्रे (विभाग प्रमुख), प्रथमेश हरी, विजय बाबर, मनोज भगवान जाधव, अनिकेत विजय भिसे, तुषार प्रभाकर साठे, किरण उत्तम भिसे, शाखाप्रमुख या नव्यानिवडींचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव आणि जिल्हा संपर्कप्रमुख शरदराव कणसे यांनी अभिनंदन केले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त