शशिकांत शिंदे यांना महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

गोवे वनगळ बोरखळ शिवथर येथील महिलांचा जाहीर पाठिंबा

शिवथर :  सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना सातारा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळणार असे वनगळ गोवे बोरखळ शिवथर येथील महिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या
कोरेगाव विधानसभेला आमदार शशिकांत शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता तो भरून काढण्यासाठी येणाऱ्या लोकसभेला मोठे मताधिक्य देऊन त्यांना दिल्लीला पाठवायचा मानस महिला वर्गाने केला आहे त्यांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे आहेत येणारी लोकसभेची निवडणूक मोठ्या अटीतटीची होणार असून दोन्ही उमेदवाराला आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.
सातारा लोकसभेमध्ये सहा विधानसभा असून कराड दक्षिण कराड उत्तर पाटण वाई सातारा कोरेगाव मतदार संघ असून सर्व ठिकाणी आमदार शशिकांत शिंदे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा झंजावात चालू आहे सर्वच राजकीय नेते मंडळी जो तापआपल्या पक्षाचा प्रचार करत असताना मतदारांनीच या वेळची निवडणूक हातात घेतली असल्याने गावातील राजकीय नेत्यांना विचारात घेतले जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे यापूर्वीची निवडणूक गावातील नेत्यांनी आदेश दिल्यानंतर तो आदेश पाळण्याचे काम लोक करत होते परंतु सध्याचे चित्र यावेळी वेगळ झालेल आहे. लोकसभेची निवडणूक पूर्णतः सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली असून महाराष्ट्र मध्ये कोणाची सत्ता येईल आता तरी सांगणे शक्य नाही त्याचे कारण ज्यावेळी सर्वसामान्य जनता निवडणूक हातात घेते त्यावेळेस मतदार हा राजा असतो हे आपल्याला काही दिवसांमध्ये दिसून येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे व भाजपाचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मतदार राजाची सबुरीनेच घ्यावे लागणार हे मात्र निश्चित
परंतु आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ गावोगावी जाऊन महिलावर्ग प्रचार करत असल्याचे दिसत आहे पूर्णतः 18 गावातील महिलांनी एकझूट करून आमदार शशिकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी चंग बांधला आहे प्रचारासाठी मेघा नलवडे आशा जाधव सुवर्णा पवार शुभांगी साबळे मेघा माने प्रभावती पवार सीमा उघडे उर्मिला कदम लक्ष्मी बाबर रूपाली साबळे नसीम इनामदार हेमलता साबळे प्रिया साबळे माधुरी पाटील दिपाली रसाळ जयश्री पाटील प्रमिला रसाळ वैशाली पाटील नूतन पाटील यशोदा पाटील छाया पाटील कमल साळुंखे संगीता कुंभार सुरेखा कुंभार सुवर्णा कुंभार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त