फलटण नगरपालिका निवडणुकीतला पराभव राजे गटासाठी की शिवसेना एकनाथ शिंदेचा?

शिवसेनेचे जोशी झाले ज्येष्ठ पवार झाले कनिष्ठ पवार झाले आता शिवसेना शिंदे. भविष्यात पुढे काय?

फलटण : मागील लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील पहिलीच तब्बल नऊ वर्षानंतर लागलेली फलटण नगरपालिकेचे निवडणुकीत बरीचशी राजकीय समीकरणे काही घडली, तर काही बिघडली. अशी जनतेच्या मनात चर्चा दिसून येत आहे. सातारा जिल्ह्याचे एकेकाळी सर्वे सर्व असणारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आता मात्र राजकारणाच्या सारीपाटावर हातबल झालेले दिसून येत आहेत. 

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेली फलटण नगरपालिकेची तब्बल नऊ वर्षानंतर होत असणारी निवडणूक मात्र मोठी रंगात आलेली होती. आणि रंगातच पार पडली. 

या निवडणुकीसाठी कधीही एवढा मोठा ताकतीचा जोर फलटण तालुक्यात दिसून आला नाही. 

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्हीकडच्या प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे शिवसेनेकडून तर चित्रा वाघ भाजपा राष्ट्रवादी कडून जाहीर सभा घेताना दिसून आल्या त्यातच फलटण आणि महाबळेश्वर सातारा जिल्ह्यातील या दोन निवडणुकीला मिळालेला वाढीव काळ पाहता निवडणुकीची रंगत आणि राजकीय समीकरणे वेगवेगळ्या पद्धतीने बदलून गेलेली दिसून आली. 

त्यातच शिवसेना शिंदे गटाकडून चार मंत्र्यांच्या समवेत झालेली सभा पण तरीसुद्धा फलटण तालुक्यात राजे गटाला पराभवाचा सामना करावा लागला याच्याबाबत आत्मचिंतन करण्याची वेळ आता राजे गटावर आलेली आहे . श्रीमंत रामराजे सर्वप्रथम निवडून आले पासून आज अखेर पर्यंत गल्ली ते दिल्ली सत्ता काबीज असलेल्या पक्षांमध्ये त्यांचं कार्य राहिलेलं आहे. असं असताना देखील त्यांनी जेवढ्या पक्षात राहिले त्यापैकी एकाही पक्षाची संघटना त्यांनी वाढू दिली नाही त्याऐवजी त्यांनी राजे गट हे गोंडस नाव वापरून स्वतःचा आणि परिवाराचा स्वार्थ साधण्याचं काम आजपर्यंत केलं. तसेच ग्रामीण भागातून अथवा शहरी भागातून एकही नवीन तरुण तडफदार नेतृत्व उभारू दिलं नाही. ही एक प्रकारची भीती म्हणायचं की स्वतःच्या अपयशाची चाहूल म्हणायचं. 1990 च्या दशकापासून शिवसेना भाजप सरकार असू द्या काँग्रेस आय राष्ट्रवादी काँग्रेस सरकार तसेच राष्ट्रवादी फुटी नंतर अजित पवार गट असू द्यात शरद पवार गट असू द्या दोन्ही डगरीवर हात ठेवून राजे गट हा त्यांच्या कार्यकर्त्यांचा वापर पुरेपूर करत राहिलं. नियतीचा फेरा कोणाला सोडत नाही हेही तितकच खरं आहे रामराजेंनी त्यांच्या पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही म्हणून नियतीनेच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ राखीव केला. परंतु त्या नियतीलाही चतुर असलेल्या बॅरिस्टर यांनी वकिलीचा पॉईंट वापरून मागासवर्गीय माणसाला पंधरा वर्षे फक्त राजे गटाचा बाहुला म्हणून वापर करून संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेची अवहेलना केली तर नंतर देखील राष्ट्रवादी फुटीच्या वेळेस अजित पवार यांनी सर्वप्रथम संपूर्ण महाराष्ट्रातून दीपक चव्हाण यांना आमदारकीचे तिकीट दिलेल असताना देखील यांनी त्यांच्याशी देखील गद्दारी केली आणि स्वतःची वेगळी चूल  करून राजे गटाच्या नावाखाली तुतारी फुकली .परंतु यावेळी नियतीने मात्र त्यांची जिरवायची ठरवली होती आणि त्यात फलटणकरांनी आणखी मजबूत साथ दिली. आणि रामराजेंची नाकर्तेपणाची एक भली मोठी कारकीर्द येथे संपली. पण शांत बसतील ते रामराजे कसले स्वतःच्या मुलाला राजकारणात आणण्या करता भाजप असो, अजित पवार गट असो, शरद पवार गट असो, सर्व ठिकाणी सर्वतोपरी प्रयत्न केले. परंतु कुठेही डाळ शिजली नाही .म्हणून शेवट अनाथाचा नाथ एकनाथ यांच्या दारी जाऊन पदर पसरून उभे राहिले. देणाऱ्यांचा हात असलेले एकनाथ यांनी त्यांनाही भरभरून दिले. परंतु त्यांनाही पद्धतशीरपणे शिवसेनेचे चिन्ह वापरून राजे गटाच्या नावाखाली फलटण नगर परिषदेची निवडणूक लढवली गेली. आणि इथेच एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या पराभवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सोलापूर जिल्हा हा फलटणच्या वेशीवर असलेला जिल्हा आहे सदर ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा एकही आमदार खासदार अथवा मोठा नेता नसताना देखील कोणत्याही प्रकारची मोठी रसद पुरवली नसताना देखील तेथील तीन नगरपरिषदा शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्याखाली लढल्या गेल्या आणि यशस्वीरित्या जिंकल्या गेल्या परंतु फलटणमध्ये मात्र राजे गटामुळे शिंदे साहेबांना खाली मान नक्कीच घालावा लागली. की ज्या ठिकाणी दोन मंत्री पालकमंत्री एवढी मोठी फौज पाठीशी असताना देखील नियतीपुढे रामराजे यांना हात आणि गुडघे टेकावेच लागले. हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना ही घराणेशाहीचे विरोधात केलेली होती .तसेच त्यांचे विचारधारेवरती काम करणारे एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील रिक्षा चालवण्यापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार चालवण्यापर्यंतचे काम याच विचारधारेवर केलेले होते आणि त्यामुळे त्यांचा एक चेहरा म्हणून वापर करून आपली घराणेशाही त्यांच्यावर लादण्याचा पराक्रम श्रीमंत घराण्याने केला .परंतु तो फसला मी आणि माझे कुटुंबातील एवढेच नेतृत्व फलटणकारांवरती लादायचं आणि मत मिळत नाहीत म्हणून रडगाणं मुंबईत जाऊन गायाचं एवढेच पदरी राहिलेला आहे आणि म्हणून फलटण मध्ये राजे गट हारला की एकनाथ शिंदे शिवसेना हरली हा प्रश्न फलटणकर जनतेच्या मनात नक्कीच राहील 

आणि याच पार्श्वभूमीवर काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद च्या निवडणुका यामध्ये कोणत्या राजकीय समीकरणातून राजे गट शिवसेना म्हणून लढणार की राजे गट म्हणून लढणार असा संभ्रम आता जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. 

खरंतर रामराजे नाईक निंबाळकर यांची राजकीय अस्तित्वातली राहिलेली ताकद ही फक्त शिवसेनेमुळेच तारली गेली. अन्यथा प्रबळ दावेदार असणारे आणि प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करत असणारे रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे 27विरुद्ध 0 चे स्वप्न नक्कीच शिवसेनेचा पाठिंबा नसता तर फलटण शहरात दिसून आला असत.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला