जिल्हा काँग्रेसमध्ये 'हम साथ साथ है' चा नारा

पक्ष संघटन वाढवण्यासाठी मोर्चेबांधणी; पृथ्वीराज चव्हाणांचा पुढाकार

सातारा :- देशावर सुमारे ६० वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या काँग्रेस पक्षाची गेल्या पंधरा वर्षात मोठी पिछेहाट झाली. सातारा जिल्हा तर काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 

मात्र,या किल्ल्याचे अनेक बुरुज निसटून गेल्याने जिल्हा काँग्रेस खिळखिळी झाली.काँग्रेस पक्षाने अनेक आघात झेलले.अनेक जण स्वार्थ साधत दुसऱ्या पक्षात गेले. मात्र,आजही काँग्रेसच्या निष्ठावंतांनी काँग्रेसला उभारी देण्याचाच प्रयत्न केला आहे. 

अंतर्गत कलह,वादविवाद टाळत आता काँग्रेसने 'हम साथ साथ है चा नारा दिला आहे. प्रत्येक तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करुन आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दाखवून देण्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकत्यांनी व्यक्त केला आहे. 


माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसला आणखी मजबुती देण्याचा प्रयत्न असून पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यानुसार जिल्हाभर नियोजन केले आहे.

इंदिरा गांधी,राजीव गांधी यांच्यानंतर सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने अनेक वर्षे देशाची सत्ता ताब्यात ठेवली. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हाताचा पंजा चिन्हाची जादू जिल्ह्याने अनुभवली आहे. त्याकाळात काँग्रेसमध्ये निष्ठावंतांची मोठी फौज होती. पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम होत होते. मात्र, गेल्या १२ ते १५ वर्षात काँग्रेसला उतरती कळा लागली. 

 


बालेकिल्यात मजबुती येणार का ?

एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या जिल्ह्यात गेल्या १२ ते १५ वर्षात काँग्रेसची अपरिमित हानी झाली. काँग्रेसने पुन्हा उभारी घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे मजबुतीकरण जिल्ह्यात सुरु आहे. जिल्हा व तालुकास्तरावर याबाबत नियोजन करण्यात येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षबांधणीला यश येणार का, बालेकिल्ला मजबूत होणार का, हे आगामी काळातच दिसून येणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला